निकालादिवशीच कोल्हापुरात राजकीय नेत्यांना ‘नो एन्ट्री’

निकालादिवशीच कोल्हापुरात राजकीय नेत्यांना ‘नो एन्ट्री’

कोल्हापुरात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, संदीप राजगोळकर, 22 मे : देशाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी लागणार आहेत. त्याच पार्श्वभूमिवर अनेक राजकीय नेत्यांना आता शहरात बंदी करण्यात आली आहे. यामध्ये उपमहापौर भूपेल शेटेंसह नगरसेवकांना देखील पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी नोटीस बजावल्या आहेत. 24 मेच्या मध्यरात्रीपर्यंत शहरात प्रवेश करू नये असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नोटीस देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

23 मे रोजी कोण विजय होणार? देशात सत्ता कुणाची येणार याचा फैसला होणार आहे. निकालापूर्वीच विरोधकांनी EVMबाबत शंका घेतल्या आहे. हे सारं प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत देखील गेलं. देशासह राज्यात देखील अद्याप विरोधक ईव्हीएमबाबत शंका घेताना दिसत आहे.

NDAच्या बाजुनं EXIT POLL

सातव्या टप्प्यातील मतदानानंतर EXIT POLL जाहीर करण्यात आले. त्यामध्ये NDAच्या हाती सत्ता राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या गोटात देखील हालचाली वाढल्या आहेत.

दरम्यान, आता निकालाला केवळ काही तास उरले आहेत. त्यानंतर देशात कुणाची सत्ता येणार? कोण बाजी मारणार? या बाबी स्पष्ट होणार आहेत.

राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत करणार प्रवेश

फिर एक बार मोदी सरकार

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार यावरून अनेक तर्कविर्तकांना उधाण आले होते. परंतु, एनडीएने पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या नावावरून पडदा टाकला आहे. नरेंद्र मोदी यांचीच पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी निवड करण्यात आली आहे.

Exit Pollमुळे उत्साह संचारलेल्या NDAच्या नेत्यांना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी रात्री शाहीभोजन दिलं. दिल्लीतल्या प्रख्यात अशोका हॉटेलमध्ये मित्र पक्षांच्या सर्व नेत्यांचा भाजपने अगत्याने पाहुणचार केला. फिर एक बार मोदी सरकार येणार असल्याने सर्वच नेत्यांच्या चेहेऱ्यावर त्याची झाक स्पष्ट दिसत होती.

SPECIAL REPORT : एक्झिट पोल खरंच विश्वासार्ह आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 10:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading