ताईंसाठी दादांची स्वारी हर्षवर्धन पाटील यांच्या दारी!

ताईंसाठी दादांची स्वारी हर्षवर्धन पाटील यांच्या दारी!

लोकसभेला राष्ट्रवादीचे काम करायचे आणि विधानसभेला मात्र काँग्रेसला मदत करायची नाही असं चालणार नाही असं काँग्रेसने सांगितले होते.

  • Share this:

मधुकर गलांडे, इंदापूर, 29 मार्च  : लोकसभा निवडणुकीचं मतदान जसं जवळ येत आहे तसं प्रचार आणि राजकीय समिकरणांची फेरजुळवणी होत आहे. बारामती मतदारसंघात कुठलीही कसर राहू नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तुम्ही लोकसभेला मदत करा, आम्ही विधानसभेला मदत करू असं आश्वासन अजित पवारांनी पाटील यांना दिलं आहे.

पवार पाटील मतभेद

इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि बारामतीचे अजित पवार  यांचे  राजकीय हाडवैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही तरी बेहत्तर पण इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादीच लढवणार असे म्हणणारे अजित पवार चक्क हर्षवर्धन पाटील यांच्या यांच्या दारात गेले. निवडणुकीदरम्यानची दादांची ही डरकाळी इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती.

विधानसभेला फटका

लोकसभेला राष्ट्रवादीचे काम करायचे आणि विधानसभेला मात्र काँग्रेसला मदत करायची नाही असं चालणार नाही असं काँग्रेसने सांगितले होते. आघाडीचा धर्म फक्त काँग्रेसनेच पाळायचा का? असाही सवाल काँग्रेसच्या नेत्यांचा होता. त्याचं कारण म्हणजे विधानसभेत राष्ट्रवादीने मदत केली नसल्याने हर्षवर्धन पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दगाबाजी नको

त्यामुळे  राष्ट्रवादी जोपर्यंत  विधानसभेसाठी शब्द देत नाहीत तो पर्यंत लोकसभेचे काम करायचे नाही.  प्रचारात सहभागी व्हायचे नाही असा निर्णय या भागात काँग्रेसने घेतला होता. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची चिंता वाढली होती. इंदापूर, भोर आणि पुरंदर या भागात काँग्रेसची मतं निर्णायक आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात हा भाग येत असल्याने या भागातून मतदान झालं नाही तर मताधिक्य घटण्याचा धोका सुप्रिया सुळेंना वाटत आहे.

कमळाचा धसका

त्यामुळे दादांनी ताईंसाठी धावपळ करत हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण हेही उपस्थित होते. बारामतीत यावेळी भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी कमळ चिन्ह मिळाल्याने त्याचा फायदा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. 2014 च्या निवडणुकीत ही जागा रासपने लढवली होती. त्यावेळी सुप्रिया सुळेंना कायम मिळत असलेलं विक्रमी मताधिक्यामध्ये लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे अजित दादांनी आता मनोमिलनासाठी प्रयत्न केले आहेत.

मोदी, घराणेशाही आणि पहिल्या भाषणावर काय म्हणाले पार्थ पवार; UNCUT मुलाखत

First published: March 29, 2019, 5:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading