Lok Sabha Election 2019 महाराष्ट्रातले काँग्रेसचे 12 उमेदवार निश्चित

Lok Sabha Election 2019  महाराष्ट्रातले काँग्रेसचे 12 उमेदवार निश्चित

11 तारखेला होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 8 मार्च : लोकसभेसाठी राज्यातील 12 उमेदवारांची नावं काँग्रेसनं निश्चित  केली आहेत. काँग्रेसच्या छाननी समितीची महत्वाची बैठक शुक्रवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीमध्ये जवळपास बारा उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तिढा जवळपास सुटला असून औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जागांवरचा पेच मात्र कायम आहे. आज ज्या उमेदवारांच्या नावावरती निर्णय घेण्यात आला त्या नावांची घोषणा येथे अकरा तारखेला होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे.

ही नावं झाली निश्चित

उत्तर पश्चिम मुंबई - संजय निरुपम

सोलापूर - सुशीलकुमार शिंदे

सांगली - प्रतिक पाटील

यवतमाळ - माणिकराव ठाकरे

नांदेड - अमिता चव्हाण

हिंगोली - राजीव सातव

नागपूर- नाना पटोले

किंवा प्रफुल्ल गुडदे-पाटील ?

राष्ट्रवादीचीही बैठक

शरद पवार यांच्याही घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक बैठकीला हजर होते. कल्याण, ठाणे, नगर, औरंगाबाद, अमरावती आणि रावेर या जागांसंदर्भात बैठकीत चर्चा. औरंगाबाद सध्या काँग्रेसकडे आहे मात्र तिथे राष्ट्रवादी लढण्यास इच्छुक आहे. त्या बदल्यात रावेरची जागा देण्याची तयारी आहे.

नगर, औरंगाबादवर तिढा

लोकसभा निवडणुकीसाठी काँँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडीचा निर्णय घेतला. पण, अद्याप देखील दोन्ही पक्षांमधील नगर आणि औरंगाबादच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. त्याच पार्श्वभूमिवर दिल्लीतील बैठकीमध्ये तोगडा निघण्याची शक्यता आहे.

काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगरची जागा मागितली आहे. राधाकृष्ण विखे - पाटील यांचे पुत्र सुजय विखे - पाटील नगरच्या जागेवरून लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. पण, राष्ट्रवादी मात्र नगरची जागा सोडण्यासाठी उत्सुक नाही.

First published: March 8, 2019, 9:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading