मुंबई, 13 एप्रिल : देशात सध्या लॉकडाऊन सुरू असल्यानं केवळ अत्यावश्यक सेवा पुरवल्या जात आहेत. आतापर्यंत कधीच बंद न राहिलेली भारतातली रेल्वेसेवा पूर्ण ठप्प आहे. केवळ मालवाहतूक करणाऱ्या मेल गाड्या सुरू आहेत. दरम्यान उत्तर पश्चिम रेल्वेनं माणुसकीचं उदाहरण समोर ठेवलं आहे. लॉकाडऊमध्ये एका बाळाच्या उपचारासाठी मदत केली आहे. त्याचं औषध फक्त राजस्थानमध्येच उपलब्ध होतं. मुलाला असा अजार होता ज्यावर फक्त उंटीणीचं दूध हेच उपचार आहे. बाळाच्या आईनं यासाठी पंतप्रधानांकडे मदतीसाठी विनंती केली होती. त्यानंतर रेल्वेनं यासाठी पुढाकार घेतला आणि राजस्थानवरून मुलासाठी दूध पोहोचवलं. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासाठी रेल्वेचं कौतुक केलं आहे.
उत्तर पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ अभय शर्मा यांनी सांगितलं की, नुकतंच मुंबईतील एका महिलेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवरून मदतीसाठी विनंती केली होती. तिच्या बाळाला ऑटिस्टिकचा आजार आहे. याचा उपचार एका खास मेड़िकल थेरपीने केला जातो. यासाठी मुलाला नियमितपणे उंटीणीचं दूध आणि डाळ यांचा वापर करण्यात येत होता. मात्र ट्रेन बंद झाल्यानं मुलाला उंटीणीचं दूध मिळणं बंद झालं. त्यानंतर आईने सोशल मीडियावर केलेल्या आवाहनानंतर यासाठी रेल्वे कामाला लागली आणि शेवटी फालना ते मुंबई 850 किमी अंतरावरून मुंबईला बाळासाठी दूध पाठवलं.
Final update
20 lts. camel milk reached Mumbai by train last night. The family has kindly shared part of it with another needy person in the city.
रेल्वेने नुकतीच बांद्रा टर्मिनस ते लुधियाना अशी पार्सल सेवा सुरू केली आहे. ही एकच ट्रेन राजस्थानमधून येते. राजस्थानमध्ये फालना स्टेशनवर उंटीणीचं दूध मिळू शकत होतं. मात्र याठिकाणी पार्सल ट्रेनचा स्टॉप नव्हता. पण दूधामुळे बाळावर उपचार होणार होते आणि त्यासाठी ट्रेन थांबवण्याचा निर्णय घेतला. तिथं 20 लीटर उंटीणीचं दूध घेऊन ते मुंबईला पाठवण्यात आलं.
लॉकाडऊन असताना बाळासाठी हे उंटीणीचं दूध पोहोचवण्याच्या कामात लोको पायलट पासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी हातभार लावला. या सर्वांमुळेच हे कठीण असं काम सहज पूर्ण झालं. आता बाळाला त्याचं औषध मिळालं असून उपचार सुरू झाले आहेत.