Home /News /maharashtra /

लॉकडाऊनमध्ये नागपूर हादरलं! लेकानेच वडिलांचं कापलं गुप्तांग, बोलत होता हिंदी सिनेमातले डायलॉग

लॉकडाऊनमध्ये नागपूर हादरलं! लेकानेच वडिलांचं कापलं गुप्तांग, बोलत होता हिंदी सिनेमातले डायलॉग

आरोपी तरुणाने त्याच्या वडिलांच्या मानेला दाताने चावलं आणि त्यानंतर त्यांचे गुप्तांग कापून त्यांची हत्या केली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहेत.

    नागपूर, 27 एप्रिल : महाराष्ट्रात (Maharashtra) लॉकडाऊनमध्ये खुनाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये एका 25 वर्षीय युवकाने रागाच्या भरात स्वत:च्या वडिलांची हत्या केली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे आरोपी तरुणाने त्याच्या वडिलांच्या मानेला दाताने चावलं आणि त्यानंतर त्यांचे गुप्तांग कापून त्यांची हत्या केली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहेत. शनिवारी रात्री नागपूरच्या हुडकेश्वर भागात ही घटना घडल्याचं पोलिसांनी रविवारी सांगितलं. विक्रांत पिल्लेवर असं आरोपी मुलाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इतका हिंस्र वर्तन करत होता की त्याला पकडण्यासाठी पोलिसांना खूप कष्ट करावे लागले. अखेर विक्रांतला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Coronavirus: कोरोनाच्या वॅक्सिनसाठी संपूर्ण जगाला भारताकडून आशा, कारण... कसा केला आरोपी विक्रांतने पित्याची हत्या अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपी विक्रांत विनाकारण संतापला आणि वडिल विजय यांच्या मानेला कडकडून चावला. तो इतका रागात आणि जोरात चावला की वडिलांच्या मानेतून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर त्याने 55 वर्षांच्या वडिलांना व्हरांड्यात ओढत नेलं आणि तिथे त्याचं गुप्तांग कापलं, ज्यामुळे वडिलांचा जागीच मृत्यू झाला. किम यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून झाली चूक जिम ट्रेनर आहे आरोपी विक्रांत हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजकमल वाघमारे म्हणाले की, "व्यवसायानं जिम ट्रेनर विक्रांत घटनेच्या वेळी हिंदी चित्रपटाचे डायलॉग बोलत होता आणि विचित्र पद्धतीने वागत होता. जेव्हा आई आणि बहिणीनं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्या लोकांना धमकावणं सुरू केलं. त्याला पकडण्यात आणि बांधून ठेवण्यात घटनास्थळी असलेल्या पोलिसांना किमान पाच पोलिसांची मदत घ्यावी लागली. बरेच प्रयत्न केल्यानंतर त्याला अटक करण्यात यश आलं. गंभीर आजाराच्या रुग्णांना फटका बसू नये म्हणून करण्यात आलं 'हे' आवाहन संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या