मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवराज्याभिषेक सोहळ्याआधी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात टाळेबंदी; संभाजीराजे काय भूमिका घेणार?

शिवराज्याभिषेक सोहळ्याआधी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात टाळेबंदी; संभाजीराजे काय भूमिका घेणार?

छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 6 जूनला किल्ले रायगडावर येण्याचे शिवप्रेमींना आवाहनही केलं आहे. यामुळं पाचाड गावातील टाळेबंदी हा आता वादाचा मुद्दा ठरणार की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रायगड, 2 जून : वाढत्या कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्याच्या (Raigad Fort) पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात टाळेबंदी (Pachad Village) लावण्यात आली आहे. कोरोनाच्या गावातील परिस्थितीवरून ग्रामपंचायतीनं हा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता हॉटेल, लॉजिंग व्यवसाय पूर्णपणे बंद राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनी (Shivrajyabhishek Raigad) कोणी गावात येऊ नये, असे आवाहन ग्रामस्थांनी शिवभक्तांना केलंंय. 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा असणार आहे. छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 6 जूनला किल्ले रायगडावर येण्याचे शिवप्रेमींना आवाहनही केलं आहे. यामुळं पाचाड गावातील टाळेबंदी हा आता वादाचा मुद्दा ठरणार की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी ग्रामस्थांनी टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. शिवप्रेमींनी सहकार्य करावं असं आवाहन पाचाड ग्रामस्थांनी केल्यानं आता शिवराज्याभिषेक दिनाचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता यावर संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडं अनेकांचं लक्ष लागलं आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीनं टाळेबंदी लावली आहे.  गावात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यानं ग्रामस्थांनी हा निर्यय घेतला असून यामध्ये शासनाच्या नियमाच्या अधिन राहुन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व हॉटेल, लॉजिंग व्यवसाय पूर्णपणे बंद केले आहेत. त्याला परिसरातील ग्रामस्थ आणि व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत व्यवसाय बंद केले आहेत. संभाजीराजेंचा शिवराज्याभिषेक दिनाचा अल्टिमेटम मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य आणि केंद्र सरकारला 6 जूनपर्यंत शिवराज्याभिषेक दिनाचा अल्टिमेटम दिला आहे. शिवराज्यभिषेक सोहळ्यात आपण आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं म्हंटलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून संभाजीराजे राज्य दौऱ्यावर आहेत. असे असताना पाचाड गावात टाळेबंदी लागू झाली आहे. हे वाचा - आयुर्वेदाच्या मदतीने बरे झाले 600 कोरोना रुग्ण; बाबा रामदेव – IMA चा वाद सुरू असतानाच मोठी अपडेट रायगडावर जाण्याची तयारी सुरू दरम्यान, राज्यभरातून मराठा बांधव रायगडावर कूच करण्याची तयारी करत आहेत. नाशिकमधून ५०० हुन अधिक वाहने रायगडच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणाऱ्या गाड्यांची सजावट करण्याचे काम करण्यात येत आहे. रायगडावर जाण्यापासून कोणी रोखले तर संघर्ष अटळ आहे, असा इशाराही काही संघटनांनी दिला आहे.
First published:

Tags: Chhatrapati shivaji maharaj, Raigad, Raigad news, Sambhajiraje chhatrapati

पुढील बातम्या