मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /हॉटेल व्यावसायिकांना लॉकडाऊन काळात केलेली एक चूक पडणार महागात, बसू शकतो मोठा फटका

हॉटेल व्यावसायिकांना लॉकडाऊन काळात केलेली एक चूक पडणार महागात, बसू शकतो मोठा फटका

Lockdown in Maharashtra : भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार होम डिलिव्हरी सेवेमध्ये असणाऱ्या सर्व जणांना लसीकरण करून घ्यावे लागेल.

Lockdown in Maharashtra : भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार होम डिलिव्हरी सेवेमध्ये असणाऱ्या सर्व जणांना लसीकरण करून घ्यावे लागेल.

Lockdown in Maharashtra : भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार होम डिलिव्हरी सेवेमध्ये असणाऱ्या सर्व जणांना लसीकरण करून घ्यावे लागेल.

मुंबई, 14 एप्रिल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध जारी करण्यात आले असून या नियमांनुसार सर्व उपहारगृहे आणि बार (Restaurants and Bar) ग्राहकांना सेवा देऊ शकणार नाही. फक्त त्या परिसरात राहणारे व हॉटेलचा अविभाज्य घटक असणाऱ्यांसाठी ही सोय उपलब्ध असेल. तसंच फक्त होम डिलिव्हरी सेवा पुरवण्यास परवानगी असेल. कोणत्याही उपहारगृह किंवा बारला भेट देऊन ऑर्डर देता येणार नाही.

कोणते नियम पाळावे लागणार?

भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार होम डिलिव्हरी सेवेमध्ये असणाऱ्या सर्व जणांना लसीकरण करून घ्यावे लागेल. ज्या इमारतींमध्ये एकापेक्षा जास्त कुटुंब राहात असतील तिथं होम डिलिव्हरी करण्यासाठी सर्व निर्बंधाचे पालन करावे लागतील आणि त्या इमारतीचे कर्मचारी हे पार्सल आतमध्ये पोहोचू शकतील. होम डिलिव्हरी करणारे कर्मचारी आणि बिल्डिंगचे कर्मचारी यांच्यातील संवाद हा अनुशासित पद्धतीने कोविड नियमांचा पालन करून व्हावा ही अपेक्षा असणार आहे.

हेही वाचा - लॉकडाऊन काळात कसा कराल विवाहसोहळा? हे नियम पाळल्यास येणार नाही कोणतीच अडचण!

कोविडचे नियम तोडल्यास अथवा त्याचे उल्लंघन केल्यास व्यक्तिश: एक हजार रुपये दंड आकारला जाईल, तसेच आस्थापनेच्या विरोधात दहा हजार रुपये दंड ठोठावला जाईल. वारंवार अशाच प्रमाणे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कोविड-19 निर्बंध लागू असेपर्यंत परवाना रद्द करण्यात येईल. अशा उपहारगृह आणि बारमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेण्याचा सल्ला दिला जात असून त्यांनी लवकरात लवकर भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दुकानांना कोणते नियम लागू असतील?

वाण्याचे दुकान, भाजीपाला दुकान, फळविक्रेते, दूधदुकाने, बेकऱ्या, खाद्यपदार्थ दुकाने या सर्वांच्या संदर्भात दाट लोकवस्तीच्या ठिकाणी दुकाने आहेत का किंवा दुकानांमधे गर्दी होते आहे का, याबद्दल स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी अभ्यास करून दुकानांच्या वेळा बदलणे तसेच दुकानांच्या वेळा निर्धारित करून देणे आवश्यक आहे. खुल्या मैदानांच्या जागा मोकळ्या जागा निर्धारित करून काही दुकाने हलवणे शक्य आहे का, तात्पुरत्या स्वरूपाची दुकानं सुरू करता येतील का, हे बघणेही आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने सर्व प्रकारचे उपाय योजणे गरजेचे आहे, ज्याद्वारे हे जीवनावश्यक व्यवहार कोविड पसरण्याला निमंत्रण देणारे ठरणार नाहीत. स्थानिक प्रशासन काही व्यवहार बंदही करू शकेल.

सध्या बंद असलेल्या सर्व दुकानांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या सर्व कामगारांचे लशीकरण करून घ्यावे तसेच ग्राहकांशी संपर्क काचेच्या संरक्षक कवचाच्या माध्यमातून यावा, ही पूर्वकाळजी घेण्याची सुविधा निर्माण करावी आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीचाही अवलंब करावा ज्याद्वारे त्यांची दुकाने कोणत्याही प्रकारे कोविड संसर्ग न पसरवता कार्यान्वित केली जाऊ शकतील.

First published:

Tags: Lockdown, Restaurant