विदर्भात या जिल्ह्यातील लॉकडाऊन स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला निर्णय

विदर्भात या जिल्ह्यातील लॉकडाऊन स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला निर्णय

पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी 3 सप्टेंबरपासून एक आठवड्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र,

  • Share this:

चंद्रपूर, 2 सप्टेंबर: कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी 3 सप्टेंबरपासून एक आठवड्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र, कोणतेही राज्य, जिल्हा यांना केंद्र शासनाची परवानगीशिवाय लॉकडाऊन करता येणार नाही, असे निर्देश मोदी सरकारनं दिले आहे. या पार्श्वभूमीवर 3 सप्टेंबरपासून चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येणारे लॉकडाऊन सध्या स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे.

हेही वाचा..मोठा निर्णय! 10वी -12वीच्या नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये नाही

पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी 3 सप्टेंबरपासून एक आठवडा चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र, केंद्र शासनाची परवानगीशिवाय जिल्ह्यात लॉकडाऊन करता येणार नाही, असं जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी स्पष्ट केलं आहे.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितलं की, पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी केल्या घोषणेनुसार 3 सप्टेंबरपासून एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन घेण्याचा प्रस्ताव परवानगीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता. मात्र, या प्रस्तावाला अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यामुळे उद्या 3 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणारे लॉकडाऊन तर्तास स्थगित करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. शासनाची परवानगी मिळाल्यानंतर यासंदर्भात तातडीनं निर्णय घेण्यात येईल, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

भाजप नेत्यानं कोरोनासाठी केविलवाना प्रयत्न...

संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट असून त्याचा नायनाट करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ अहोरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र, काही राजतीय मंडळी पूज-पाठ-हवन करून कोरोना पळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा...

काही दिवसांपूर्वी चंद्रपूर तालुक्यातील विचोडा येथील असा एक धक्कादायक प्रकार उजेडात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भाजप नेत्यानं चक्क एका मंदिरात होमहवन केलं. दरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भालामुळे मंदिरं बंद आहेत. सर्वत्र कडक नियम पाळले जात आहेत. मात्र, भाजपचे नेते अनिल डोंगरे यांनी अतिउत्साहात सरकारचे सर्व नियम झुगारून अख्खं गाव गोळा करून मंदिरात हवन पूजा केली. अनिल डोंगरे हे विचोडा गावचे सरपंच आणि भाजयुमोचे तालुकाध्यक्ष आहेत. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 2, 2020, 5:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading