अमरावतीकरांनी करून दाखवलं, लॉकडाऊनमुळे रुग्ण संख्या मंदावली

अमरावतीकरांनी करून दाखवलं, लॉकडाऊनमुळे रुग्ण संख्या मंदावली

अनलॉकनंतर देशातील पहिला लॉकडाऊन हा अमरावतीत लागला होता. मात्र अमरावतीकरांनी लॉकडाऊनचे चांगले पालन केल्याने ....

  • Share this:

अमरावती, 17 एप्रिल : राज्यात कोरोनाची (corona cases maharashtra ) परिस्थिती बिकट होत असल्यामुळे लॉकडाऊन (Maharashtra Lockdown)लागू करण्यात आला आहे. पण, अजूनही लोकं लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नसल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करून अमरावतीकरांनी (Amravati) कोरोनाची भयावह लाट आता परतावून लावल्याचे चित्र आहे.

फेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या व मृत्यू संख्या ही झपाट्याने वाढत होती. जिल्ह्यात 14 दिवस पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले होते, त्यामुळे अमरावती जिल्हा हा राज्यातच नव्हे तर देशात कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. अनलॉक नंतर देशातील पहिला लॉकडाऊन हा अमरावतीत लागला होता. मात्र अमरावतीकरांनी लॉकडाऊनचे चांगले पालन केल्याने  कोरोना रुग्ण संख्याचा वेग मंदावला होता.

Explainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल?

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत जिल्ह्यातील मनपा क्षेत्रात व अचलपूर तालुक्यात सुरुवातीला  एक आठवड्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली.  तर पुढे आणखी 7 दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला म्हणजे एकूण 14 दिवस लॉकडाऊन करण्यात आले होते. नंतर इतर तालुक्यात सुद्धा लॉकडाऊन करण्यात आले.

Weather Update:उत्तर भारतात अवकाळी पावसाचा धोका कायम; काय असेल राज्यातील स्थिती?

यात अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या बाजारपेठ बंद होत्या तर चाचण्या सुरुवाती प्रमाणे सुरूच होत्या.अमरावती पॅटर्नचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कौतुक केलं होतं.

फेब्रुवारी महिन्यात 22 ते 28 तारखेदरम्यान 5593 रुग्ण संख्या सरासरी होती. तर महिन्याभरानंतर 22 ते 30 मार्च दरम्यान रुग्ण संख्या 2981 वर आली होती. रुग्ण संख्या तर कमी झालीच मृतांचे प्रमाण सुद्धा कमी झाले होते.

फेब्रुवारी महिन्यातील रुग्ण संख्या

फेब्रुवारी 1-7- रुग्ण 4407

फेब्रुवारी 8-14,रुग्ण 2463

फेब्रुवारी15-21,रुग्ण -4063

फेब्रुवारी 22-28,रुग्ण 5593

लॉकडाऊन नंतर मार्च महिन्यातील रुग्ण संख्या

मार्च 1-7 रुग्ण 4404

मार्च 8-14,रुग्ण 2526

मार्च 15-21,रुग्ण 2898

मार्च 22-30,रुग्ण 2981

Published by: sachin Salve
First published: April 17, 2021, 4:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या