लॉकडाउनमध्ये लग्नाची घाई पडली महागात, नवरा-नवरीची वरात थेट पोलिसांच्या दारात!

लॉकडाउनमध्ये लग्नाची घाई पडली महागात, नवरा-नवरीची वरात थेट पोलिसांच्या दारात!

सण, उत्सव, समारंभावर बंदी घातली आहे. असे असतांना उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर 5 च्या दसेरा मैदानात एक लग्न समारंभ सुरू होता.

  • Share this:

उल्हासनगर, 16 एप्रिल :  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना लग्नच काय इतर समारंभांसाठी देखील राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मात्र, तरी देखील एका नवरा-नवरीला लग्न सोहळा उरकण्याची घाई चांगलीच अंगाशी आली आहे. लग्नाला नातेवाईक जमा केल्याने पोलिसांनी नवरा नवरीला ताब्यात घेतले आहे.

राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे या महामारीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने अनेक कठोर पावले उचलत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. शिवाय गर्दी जमणाऱ्या सण, उत्सव, समारंभावर बंदी घातली आहे. असे असतांना उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर 5 च्या दसेरा मैदानात एक लग्न समारंभ सुरू होता.

हेही वाचा - ठाकरे सरकारविरोधात भाजपचा आणखी एक नेता मैदानात, विखे पाटलांनी केली खरमरीत टीका

या लग्न समारंभाला 10 ते 15 वऱ्हाडी हजर होते. या लग्नाची माहिती उल्हासनगर हिल लाईन पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता लग्नाला आलेल्या  वऱ्हाडीकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

त्यामुळे पोलिसांनी नवरा नवरी आणि त्याच्या आई वडिलांना ताब्यात घेत पोलीस ठाण्याला नेले. दरम्यान, या  लग्नाच्या समारंभासाठी परवानगी घेतली होती का याची माहिती पोलीस घेत आहेत. आता यासंबंधी चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा - ड्रेस इस्त्री केला नाही म्हणून करिनानं स्टाफवर काढला राग, व्हायरल झाला VIDEO

दरम्यान या लग्न सोहळ्यातील नवरा,नवरी आणि वऱ्हाडीवर पोलिसांनी कारवाई केल्यामुळे गुपचूप समारंभ करण्याचा विचार करणाऱ्याचे मात्र, चांगलेच धाबे दणाणले आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: April 16, 2020, 4:51 PM IST

ताज्या बातम्या