पुणे शहरानंतर आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा

पुणे शहरानंतर आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊनची घोषणा (13 जुलै ते 23 जुलै) करण्यात आली असतानाच आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे.

  • Share this:

नांदेड, 10 जुलै : अनलॉक प्रक्रियेनंतर राज्यातील मोठ्या शहरांसह इतर भागातही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनचं सत्र सुरू झालं असून विविध शहरांसह जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित केला जात आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊनची घोषणा (13 जुलै ते 23 जुलै) करण्यात आली असतानाच नांदेड जिल्ह्यातही लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

संपूर्ण नांदेड जिल्ह्यात 12 जुलै ते 20 या काळात संचारबंदी असणार आहे. याबाबत नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. लॉकडाऊन काळात नांदेडमध्ये केवळ अत्यावश्य सेवांनाच सूट असेल.

सरकारी कार्यालये, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांना सूट देण्यात आली आहे. तर आठवडी बाजार बंद असून विक्रेत्यांना सोसायटीमध्ये जाऊन फळे, भाजीपाला विक्रीस सकाळी 9 ते दुपारी 2 या काळात परवानगी देण्यात आली आहे. तसंच जिल्ह्याबाहेरून फक्त अत्यावश्यक कामासाठीच प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे.

भुसावळ शहरातही लॉकडाऊन

भुसावळ शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने 7 ते 13 जुलै या काळात शहरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. शहरातील औद्योगिक प्रतिष्ठाने, बाजारपेठ किराणा दुकाने, भाजीपाला बाजार, फळ विक्री तसेच मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली. नगरपालिका प्रशासन विविध उपाय योजना राबवत आहे. याच उपाय योजनेचा भाग म्हणून नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सच्या विरोधात मोठी मोहीम सुरू करण्यात आली.

Published by: Akshay Shitole
First published: July 10, 2020, 4:27 PM IST

ताज्या बातम्या