लॉकडाउन 5.0 सुरू होताच राज्यासाठी धक्कादायक बातमी, नाशकात एकाच दिवशी 12 जणांचा मृत्यू

लॉकडाउन 5.0 सुरू होताच राज्यासाठी धक्कादायक बातमी, नाशकात एकाच दिवशी 12 जणांचा मृत्यू

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नाशिक, 01 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. लॉकडाउनचा पाचवा टप्पाही आजपासून सुरू झाला आहे. परंतु, नाशिकमधून धक्कादायक बातमी आली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 48 नवे रुग्ण आढळून आले आहे. नाशिकमध्ये एकाच दिवशी 12 जणांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1224 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे.  आतापर्यंत मालेगावमध्ये 55, नाशिक शहर 9 तर जिल्ह्यातील 4 तालुक्यात 8 बळी गेले आहे. त्यामुळे मृतांची संख्याही 72 वर पोहोचली आहे.

हेही वाचा-पुणेकरांसाठी कसा असेल लॉकडाऊन 5.0, या नियमांसह आज येणार नवा आदेश

जिल्ह्यात गेल्या 24 तासात 48 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.  मालेगाव हॉट स्पॉट कायम आहे. तर

नाशिक शहर जिल्ह्यात दुसरा हॉटस्पॉट ठरला आहे. शहरात 214 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.  यातील 148 रुग्णांना डिस्चार्ज तर 66 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे.

एकीकडे शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे तर ग्रामीणमध्ये 174 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. यातील 106 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरीत रुग्णांवर उपचार सुरू आहे.

हेही वाचा-लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना आणखी एक झटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; असे आहेत दर

जिल्ह्यातील नाशिक,चांदवड,सिन्नर, दिंडोरी, निफाड,देवळा, नांदगाव, येवला,बागलाण,सटाणा,इगतपुरी यासह मालेगाव या 12 तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या 1224 वर पोहोचली आहे. यातील 919 रुग्ण बरे झाले आहे.  सध्या जिल्ह्यात 305 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे.

संपादन - सचिन साळवे

Tags: corona
First Published: Jun 1, 2020 08:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading