लॉकडाउनबद्दल अजित पवारांनी दिले मोठे संकेत; मुख्यमंत्र्यांशीही बोलणार!

लॉकडाउनबद्दल अजित पवारांनी दिले मोठे संकेत; मुख्यमंत्र्यांशीही बोलणार!

गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील व्यवहार ठप्प आहे. लोकंही अडकून पडली आहे. त्यामुळे फार काळ लोकांना लॉकडाउनमध्ये आता अडकवणे योग्य नाही.

  • Share this:

मुंबई, 27 मे : महाराष्ट्रात लॉकडाउनचा चौथा टप्पा आता लवकरच संपणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून काय उपाययोजना करता येतील, यासाठी आढावा घेतला जात आहे. परंतु, चौथा लॉकडाउन संपल्यानंतर रेड झोन क्षेत्रात आणखी अटी शिथिल कराव्यात अशी राष्ट्रवादीची आग्रही मागणी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबद्दल सांगणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 31 मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आलं होतं. पण,  चौथा लॉकडाउन संपल्यानंतर रेड झोन क्षेत्रात औद्योगिक आणि सामान्य जनजीवन सुरू करण्याबाबत काही निर्णय घ्यावे लागतील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.

मुंबई एमएमआरडीए परिसर, पुणे, पिपंरी-चिंचवड रेड झोन क्षेत्रात चौथा लॉकडाऊन संपल्यानंतर अधिक अटी शिथिल कराव्या लागतील, अशी स्पष्ट भूमिका अजित पवारांनी मांडली.

हेही वाचा -राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या नारायण राणेंना शिवसेनेनं फटकारलं

गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील  व्यवहार ठप्प आहे. लोकंही अडकून पडली आहे. त्यामुळे फार काळ लोकांना लॉकडाउनमध्ये आता अडकवणे योग्य नाही. योग्य खबरदारी घेऊन रेड झोन क्षेत्रात पुन्हा कार्यरत व्हावे लागेल, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

राज्यात रेड झोन क्षेत्रात  येत्या काळात अधिक खबरदारी घेत अटी शिथिल करून जास्त मुभा देणे गरजेचं आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी न्यूज  न्यूज 18 लोकमतला दिली,

हेही वाचा -गेल्या 24 तासांत 6387 नवीन रुग्णांची नोंद, तरी भारतासाठी आनंदाची बातमी

महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख मंत्री आणिराज्याचे मुख्य सचिव अजय मेहता तसेच आरोग्य नगर विकास ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण या विभागाचे सचिव यांची वर्षा बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सर्व जिल्ह्यात स्थानिक पातळीचा आढावा, तसंच औद्योगिक क्षेत्र पुन्हा सुरू करणे, रेड झोन क्षेत्रात रिलॅक्सेशन देणे यावर प्रामुख्याने चर्चा केली जाईल, असंही अजित पवारांनी सांगितलं.

दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही लॉकडाउन संपल्यानंतर काय करावे यावर चर्चा झाली.  अन्य राजकीय चर्चांत अजिबात तथ्य नाही, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

संपादन - सचिन साळवे

First published: May 27, 2020, 10:28 AM IST

ताज्या बातम्या