मुंबई, 21 एप्रिल : लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात बाल अश्लीलतेच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र पोलिसात चाईल्ड पोर्नोग्राफीचा ऑनलाइन शोध आणि आशयाचा प्रसार यासंबंधी 133 गुन्हे दाखल आहेत. तसेच 46 लोकांना अटक केली आहे. आपल्या राज्यासाठी ही अत्यंत लाजीवरवाणी बाब आहे.
गृह मंत्रालयाच्या मते, इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन फंडच्या निदर्शनास आले की, गेल्या एक महिन्यात 'चाइल्ड पॉर्न', 'सेक्सी चाइल्ड' आणि 'टीन सेक्स व्हिडिओ' अशा शब्दांसाठी ऑनलाईन शोध वाढले आहेत. देशातील बर्याच मोठ्या शहरांमध्ये अशी प्रकरणे नोंदली गेली आहेत. नोबेल पारितोषिक विजेता कैलाश सत्यार्थी यांचा मुलगा भुवन रिभू यांनी यावर्षी जानेवारीत या संस्थेची सुरूवात केली होती.
गृहमंत्र्यांनी सायबर सेलला ऑपरेशन वेगवान करण्याचे आदेश दिले. जानेवारीपासून महाराष्ट्रातील चाईल्ड पोर्नोग्राफरला अटक करण्यासाठी ऑपरेशन ब्लॅकफेस चालविण्यात आलं होतं. ज्याचं परीक्षण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं. अनिल देशमुख यांनी चाईल्ड पोर्न सर्चला जास्त मागणी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांना रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलला दुप्पट प्रयत्न करण्यास सांगितलं आहे.
3 मेनंतर असा असेल लॉकडाऊनचा एक्झिट प्लान, मोदी सरकारची Exclusive स्टोरी
समाजात अधिक पीडोफाइल आणि चाईल्ड बलात्कारीच जास्त
एका वरिष्ठ पोलिस अधिराकाऱ्याने सांगितले की, मुलांवर होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी या पथकाने प्रयत्न सुरू केले आहेत. ते पुढे म्हणाले, "लॉकडाऊनमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफी पाहणाऱ्यांमध्ये वाढ होत आहे. यावरून आपण अंदाज लावू शकतो की समाजात किती मोठी पीडेफाइल(लैंगिक अत्याचार करणारी मुलं), लहान मुलांवर बलात्कार करणारे लोक यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. "
मध्य प्रदेशात झाली मंत्रिमंडळाची स्थापना, या 5 मंत्र्यांनी घेतली शपथ
पालकांनी मुलांवर देखरेख ठेवली पाहिजे
पोलिसांनी त्यांच्या पालकांच्या मुलांच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवण्याचा अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाला की, मुलांसमवेत इंटरनेट चालवा जेणेकरून तो तुमच्याकडून योग्य वागणूक शिकू शकेल. याशिवाय संगणक अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जिथून आपण मुलांवर लक्ष ठेवू शकता. कुटुंबियांनी आणि जबाबदार पालकांनीच आपल्या मुलांवर लक्ष ठेवल्यास चाईल्ड पॉर्नोग्राफी नक्कीच कमी होईल.
'त्या' लोकांना लवकरात लवकर डोंबिवलीबाहेर हलवावे, मनसे आमदाराचे सरकारला पत्र
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.