मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कर्मकांड, दशक्रियेचे 'लॉक' कधी उघडणार? राक्षस भुवनमधील पुरोहितावर उपासमारीची वेळ

कर्मकांड, दशक्रियेचे 'लॉक' कधी उघडणार? राक्षस भुवनमधील पुरोहितावर उपासमारीची वेळ

शनीच्या साडेतीन पीठापैकी एक असलेलं राक्षस भुवनचे शनी मंदिर आहे. देशभरातून भाविक येत असतात.

शनीच्या साडेतीन पीठापैकी एक असलेलं राक्षस भुवनचे शनी मंदिर आहे. देशभरातून भाविक येत असतात.

शनीच्या साडेतीन पीठापैकी एक असलेलं राक्षस भुवनचे शनी मंदिर आहे. देशभरातून भाविक येत असतात.

बीड, 29 जून: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दक्षिण श्री क्षेत्र मंजरथ व श्रीशनीचे राक्षस भुवन येथील पूजाविधी आणि दशक्रिया विधीला 'लॉक' पडल्याने गेल्या 3 महिन्यांपासून पुरोहितांची रोजीरोटीच बंद आहे. एक जूनपासून शासनाने मिशन बिगेन अगेन सुरू करून अनेक व्यवसायांना अटी-शर्तीवर परवानगी दिली असली तरी पुरोहित कर्मकांड, दशक्रिया विधी अद्यापही बंदच आहे. यामुळे पुरोहित याज्ञिकी आणि पूजा सुरू करण्याची मागणी पुरोहितांनी केली.

हेही वाचा...पंढरपुरात उद्यापासून संचार बंदी, केवळ 'या' लोकांनाच मिळणार मंदिरात प्रवेश

माजलगाव तालुक्यातील गोदावरी तिरावर वसलेल्या श्री क्षेत्र दक्षिण काशी मंजरथ येथे तीन नद्यांचा संगम होतो. या त्रिवेणी संगमामुळे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंजरथला अहिल्याबाई होळकरांनी दगडाचा घाट बांधलेला आहे. या ठिकाणाला अस्थी विसर्जन, कर्मकांड, दशक्रिया विधीसाठी फार मोठे महत्त्व आहे. त्यामुळे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यासह बीड जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक या ठिकाणी कर्मकांड विधी कार्यासाठी येतात. गावातील जवळपास 40 ते 50 ब्राम्हण पुरोहितांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. तीन महिन्यांपूर्वी कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने मंजरथ येथील सर्व विधी बंद करण्यात आले आहेत. तर दुसरीकडं शनीच्या साडेतीन पीठापैकी एक असलेलं राक्षस भुवनचे शनी मंदिर आहे. देशभरातून भाविक येत असतात. गोदावरी तीर असल्यामुळे या ठिकाणी देखील श्राद्ध, दशक्रिया विधी, शांती, आदी कार्यक्रम बंद आहेत. यामुळं या ठिकणी देखील 100 कुटुंबाबाबतीत हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

मंजरथ येथील नंदिनी जोशी आणि भास्कर जोशी यांच्या कुटुंबात 6 जण आहेत. या सर्वांचा उदरनिर्वाह अस्थी विसर्जन , कर्मकांड, दशक्रिया विधी यातून होतो. मात्र, आता तीन महिन्यांत कोणी ही इकडे फिरकले नाही. परिणामी घरातील सगळं नियोजन बिघडलं आहे. तर पोटापिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धान्य संपले कसबस घर चालून उदरनिर्वाह सुरु आहे. घरातील सगळ काही आता संपल आहे. घरातील एक व्यक्ति कमवता आहे. तोहि व्रद्ध आहे. त्यांना बाहेर जावून याज्ञिकी पूजा करणं जमत नाही, या विधि सुरु झाल्या तर आमच घर चालेल म्हणून परवानगी द्या, अशी मागणी नंदिनी जोशी यांनी केली आहे.

हेही वाचा... मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून मोठी घोषणा,आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता

एक जूनपासून शासनाने लॉकडाउन शिथिल करत राज्यातील अनेक व्यवसायांना परवानगी दिली आहे परंतु मंजरथच्या कर्मकांड विधीचे लॉक अद्यापही निघाले नाही .40 ते 50 पुरोहितांचे पोट याच विधीवर असताना 3 महिन्यांपासून हा व्यवसायच बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तहसील प्रशासनाला याबाबत लेखी निवेदन देऊनही कोणताच निर्णय होत नसल्याने तीन महिन्यांपासून पडलेले लॉक उघडण्याची मागणी केली सरकार आणि प्रशासनाने दशक्रिया विधि सुरु कराव्यात सोशल डिस्टन्स पळून आम्ही विधि करू अशी ग्वाही देखील प्रमोद जोशी यांनी दिली आहे.

First published:

Tags: Beed, Beed news, Maharashtra news, Marathwada