लॉकडाऊनच्या काळात भिवंडीत खून, पॉवरलूम कामगारावर धारदार शस्त्राने सपासप वार 

लॉकडाऊनच्या काळात भिवंडीत खून, पॉवरलूम कामगारावर धारदार शस्त्राने सपासप वार 

कारीवली येथील तलावाजवळ एका यंत्रमाग कारखान्यातील कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला आहे.

  • Share this:

भिवंडी, 18 एप्रिल: शहरा लगतच्या कारीवली येथील तलावाजवळ एका यंत्रमाग कारखान्यातील कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला आहे. अज्ञात मारेकऱ्याने पाठीमागून धारदार शस्त्राने कामगाराचा भोसकून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. अजित स्वयंकांत पटेल (47 रा. बालाजी नगर, कारीवली) असे हत्या झालेल्या यंत्रमाग कामगाराचे नाव आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पटेल हा कामगार भंडारी कंपाऊंड येथे कारखान्यात काम करीत होता. तो सकाळी कारखान्यातील लाईट बंद करण्यासाठी कारीवली तलावमार्गे रस्त्याने पायी निघाला होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात मारेकऱ्याने त्याच्या पाठीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात अजित पटेल याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा..जालन्यात खळबळ: आरोग्य अधिकाऱ्याच्याच गाडीत सापडल्या दारुच्या बाटल्या

या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे. ही हत्या चोरीच्या हेतून करण्यात आली, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक नरेश पवार (क्राईम ) हे करीत आहेत.

हेही वाचा..औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह महिलेची यशस्वी डिलिव्हरी, दिला गोंडस मुलीला जन्म

खाडीकिनारी जुगार खेळण्यासाठी गर्दी 

कोरोनाच्या पाश्वभूमीवर संचारबंदी असतान शहरातील म्हाडा कॉलनी जवळील खाडीच्या किनारी बसून जुगार खेळण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. लहान मुले घराबाहेर खेळण्यासाठी येत आहे. शासन वारंवार सोशल डिस्टंसिंगबाबत सूचना करत आहेत. मात्र, भिवंडीतील नागरिकांना अद्याप कोरोनाचे गांभीर्य समजत नसून आज भिवंडीत कोरोनाबाधितचा आकडा 6 वर गेला आहे. तरीही म्हाडा कॉलनीजवळ चक्क जुगार  खेळण्यासाठी नागरिक गर्दी करीत असल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 18, 2020, 8:06 PM IST

ताज्या बातम्या