Home /News /maharashtra /

राज्यात निवडणुकांचा धुरळा, महाआघाडीचा वारू रोखणार की भाजपलाच बसणार धक्का?

राज्यात निवडणुकांचा धुरळा, महाआघाडीचा वारू रोखणार की भाजपलाच बसणार धक्का?

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची एकत्रित ताकद भाजपला अस्मान दाखवणार की भाजप महाविकास आघाडीलाच धक्का देणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

    मुंबई, 7 जानेवारी : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुका सुरू असतानाच आज अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकांत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची एकत्रित ताकद भाजपला अस्मान दाखवणार की भाजप महाविकास आघाडीलाच धक्का देणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या नागरपुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भाजपचा प्रभाव कमी करण्यासाठी निवडणुका लढत आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीने तीन मंत्र्यांना हा भार सोपविला आहे. त्यामुळे ही निवडणूक नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या 58 सर्कलसाठी 270 तर पंचायत समितीच्या 116 गणासाठी 497 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षासह गोंडवाना गणतंत्र पार्टी, प्रहार, बहुजन वंचित विकास आघाडी या पक्षाचेही उमेदवार रिंगणात आहेत.आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा नवा पॅटर्न, राज्यात तयार होणार नवी 7 मंत्रालये अकोल्यात मतदानाला सुरुवात अकोला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सात वाजता पासून शांततेत जिल्हाभरात सुरुवात झाली आहे. या वेळी होणारी जिल्हा परिषदेची निवडणूक सर्वच पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरणार आहे. अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 53 तर सातही पंचायत समितीमधील 106 गणांसाठी मतदार रांगा लावून मतदान करायला हजर झाले आहेत. धुळ्यातही महाआघाडी विरुद्ध भाजप असा रंगणार सामना धुळे जिल्ह्यात धुळे जिल्हा परिषदेसह आणि चार पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहेत. काही तुरळक प्रकार वगळता सर्वत्र मतदान प्रक्रियाही सुरळीत सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी थंडीचा जोर असल्यामुळे मतदानाला फारसा प्रतिसाद मिळालेला दिसून आला नाही. धुळे जिल्ह्यात भाजपचे पाच सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यामुळे 51 गटासाठी इथे 161 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर दोन गण बिनविरोध झाल्याने आत्ता 110 गणांसाठी 325 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना होणार आहे. अजित पवार हे माझे बॉस नाहीत - अशोक चव्हाण वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी जिल्ह्यातील सर्व 852 मतदान केंद्रांवर मॉक पोल प्रक्रिया पूर्ण होऊन सकाळी 7.30 वा.पासून सर्वत्र मतदानास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 52 आणि 6 पंचायत समितीच्या 104 सदस्यांसाठी आज मतदान होणार असून,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात 852 मतदान केंद्रावर 7 लाख 45 हजार 76 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.मतदान शांततेत पार पडावं यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालघरमध्ये महाविकास आघाडी नाही! पालघर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्हा परिषद निवणुकीसाठी 1312 मतदान केंद्रावर मतदान होणार असून यासाठी 7221 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्राचा वापर होणार आहे . 1312 मतदान केंद्रासाठी 1850 ईव्हीएम मशीन वितरित करण्यात आल्या आहेत .पालघर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदारांची संख्या दहा लाख 44 हजार 288 असून त्यात पाच लाख तीस हजार 621 पुरुष मतदार,पाच लाख 14228 महिला आणि 39 इतर मतदार आहेत. राज्यात महाविकास आघाडी असली तरी पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 213 उमेदवार रिंगणात आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: BJP, Congress, NCP, Shivsena

    पुढील बातम्या