तलाठ्याची मुजोरी, वाळू तस्करी रोखणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवरच उचलला हात

तलाठ्याची मुजोरी, वाळू तस्करी रोखणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवरच उचलला हात

तलाठी करत होता वाळू तस्कारांना मदत. जिल्हाधिकाऱ्यावरच उचलला हात.

  • Share this:

विशाल माने, परभणी 27 मे : राज्यातल्या अनेक भागात वाळू तस्करांची मुजोरी वाढली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे तस्कर वाळूचा बेसुमार उपसा करत असतात. ही वाळू तस्करी रोखण्यासाठी धडाडीने काम करणाऱ्या एका जिल्हाधिकाऱ्यावरच तलाठ्याने हात उचलल्याची धक्कादायक घटना पूर्णा तालुक्यात घटली.

पूर्णा तालुक्यातील गोदावरी पात्रांमध्ये होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जात असलेल्या परभणीचे जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या अंगावर वसमत तालुक्यातील रिधुरा सज्जाचा तलाठी धावून गेल्याच्या घटनेने खळबळ उडालीय. तलाठ्यांच्या विरोधात पूर्णा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी सध्या वाळू तस्करांच्या विरोधात मोहीम उघडली आहे.

त्या मोहिमेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी हे रविवारी रात्री स्वतःआपल्या गाडीमधून पूर्णा तालुक्यात कानडखेड येथे कारवाईसाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीच्या पाठीमागे एक इसम येताना त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी गाडी थांबवून त्याची चौकशी केली. पण त्याला आपण जिल्हाधिकारी असल्याचं सांगितलं नाही. वाळू तस्करीबाबत बोलताच तो जिल्हाधिकाऱ्यांवरच धावून गेला आणि हातही उगारला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षकांनी त्याला रोखलं त्यामुळे शिवशंकर यांना इजा झाली नाही. खंडू पुजारी असं त्या तलाठ्याचं नाव आहे. ते  जिल्हाधिकारी असल्याचे समजल्यावर, खंडू यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र अंगरक्षकाने त्यांना पकडलं आणि पोलिसांच्याच्या ताब्यात दिलं. त्याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. हा तलाठी वाळू तस्करांना मदत करतो का याचीही पोलीस चौकशी करत आहेत.

First published: May 27, 2019, 9:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading