राणेंना पक्षात घेण्यावरुन भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद

राणेंना पक्षात घेण्यावरुन भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद

भाजपाचा कणकवली विधानसभेचा उमेदवार गल्लीतून नाही तर दिल्लीतून ठरेल असं म्हणत त्यांनी नारायण राणेंना टोला लगावला. त्यामुळे राणेंना पक्षात घेण्यावरुन स्थानिक भाजपात मतभेद असल्याचं पुढे येतंय.

  • Share this:

दिनेश केळुस्कर, कणकवली 18 सप्टेंबर : ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा घोळ सध्या सुरू आहे. राणे हे भाजपमध्ये येण्यासाठी आसुसलेले आहेत. तर भाजपने त्यांना वेटिंगवर ठेवलंय. महाजनादेश यात्रेदरम्यान कणकवलीत आलेल्या मुख्यमंत्र्यांचं नारायण राणे यांनी स्वागत केलं. लवकरच आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र नेमकी तारिख सांगितली नाही. हा प्रवेश मुंबईत व्हावा अशी आपली इच्छा असल्याचं ते म्हणाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी राणेंचं गाव असलेल्या कणकवलीत झालेल्या जाहीर सभेत मात्र राणेंचा उल्लेखही केला नाही. त्यातच भाजपचे सिंधुदुर्ग  जिल्हाध्यक्ष प्रमोज जठार यांनी आज कणकवलीत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशाचे कोणतेही संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले नाहीत असं स्पष्ट केलं. भाजपाचा कणकवली विधानसभेचा उमेदवार गल्लीतून नाही तर  दिल्लीतून ठरेल  असं म्हणत त्यांनी नारायण राणेंना टोला लगावला. त्यामुळे राणेंना पक्षात घेण्यावरुन स्थानिक भाजपात मतभेद असल्याचं पुढे येतंय.

VIDEO मुख्यमंत्र्यांना कोण खोटं बोलायला लावतंय? आदित्य ठाकरेंनी केला गंभीर आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी कोकणात पोहोचली. या यात्रेचं सिंधुदुर्गात Sindhudurg नारायण राणे Narayan rane यांनी स्वागत केलं. भाजप प्रवेशोत्सुक राणे यांना त्यांच्या लांबलेल्या प्रवेशासंदर्भात आणि भाजप- सेना युतीबद्दल विचारलं असता, त्यांनी मोठा खुलासा केला. "मी भाजपत प्रवेश करणार हे निश्चित आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर माझा विश्वास आहे. भाजपच्या तिकिटावरच आमच्या संघटनेचे आमदार लढणार आणि पक्ष विलीन करून भाजपमध्ये प्रवेश करणार", असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात घेरण्याची काँग्रेसची योजना, ही आहे उमेदवार

राणे सध्या भाजपने पुरस्कृत केलेले राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा औपचारिक भाजप प्रवेश अद्याप झालेला नाही. दुसरीकडे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढून जिंकून आले होते. ते अजूनही त्याच पक्षात आहेत.

अद्याप प्रवेश नाही कारण...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गातच पक्षप्रवेश का नाही केला, असं विचारल्यावर राणे म्हणाले, "भाजप प्रवेश मुंबईतच व्हावा, अशी माझी इच्छा आहे. तो लवकरच होईल."

First published: September 18, 2019, 8:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading