सातारा, 22 जुलै : सातारा (Satara) जिल्ह्यातील पाटण (Patan) तालुक्यात गुंजाळी (Gunjali) नावाच्या गावात भूस्खलन (Land sliding) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अख्खं गाव खचल्याची माहिती मिळत आहे. हे अख्खंच्या अख्खं गाव तातडीनं इतरत्र हलवण्याचे (Shift) आदेश प्रशासनानं (administration) दिले आहेत. गावातील बहुतांश गावकरी सध्या गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले आहेत.
सातारा जिल्ह्यातील गुंजाळीमध्ये अचानक जमीन खचल्याचं दिसून आलं. सुरुवातीला नेमकं काय घडतंय हे कुणालाच कळलं नाही. मात्र जेव्हा जमीन खचू लागली, तेव्हा गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. गावातले लोक सैरावैरा पळू लागले आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आतापर्यंत या घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी प्रचंड घबराट पसरली आहे.
हे वाचा -LIVE: रत्नागिरी-खेडच्या शिरगावातला पूल गेला वाहून, 12 वाड्यांचा संपर्क तुटला
गावकऱ्यांना हलवण्याचे आदेश
या गावातील सर्वच्या सर्व नागरिकांना इतरत्र हलवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. भूस्खलनाची घटना हा भूगर्भातील मोठ्या हालचालींचा परिणाम असतो. अशा घटना एकदा घडल्यानंतर वारंवार त्याचे परिणाम जाणवण्याची शक्यता असते. आणखी काही भागातही भूस्खलन होण्याची शक्यता असते. कुठलीही दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्ह्णून गावातील सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र प्रशासनाने हालचाल करण्यापूर्वीच बहुतांश ग्रामस्थ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईकांकडे, मित्रांकडे किंवा इतरत्र आसरा शोधत गाव सोडून निघून गेले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.