फक्त 5 हजार शेतकऱ्यांनाच मिळाली कर्जमाफीची रक्कम

फक्त 5 हजार शेतकऱ्यांनाच  मिळाली कर्जमाफीची  रक्कम

25 नोव्हेंबर पर्यंत 75 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत केवळ 5 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकलेली आहे. उर्वरित 56 लाख 54 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम कधी मिळणार याचे उत्तर ना सहकार खात्याकडे आहे ना माहिती तंत्रज्ञान खात्याकडे आहे.

  • Share this:

21 नोव्हेंबर: महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी योजना तांत्रिक घोळात अडकली आहे, 25 नोव्हेंबर पर्यंत 75 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत केवळ 5 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकलेली आहे. उर्वरित 56 लाख 54 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम कधी मिळणार याचे उत्तर ना सहकार खात्याकडे आहे ना माहिती तंत्रज्ञान खात्याकडे आहे.

मुख्यमंत्री कार्यालयही लवकरच सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यापलिकडे काही उत्तर देत नाही आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की गाजावाजा करून आणलेली ऑनलाईन कर्जमाफी प्रक्रिया या घडीला तरी फसलेली आहे. या योजनेचा फायदा एकुण 77.29 लाख शेतकऱ्यांना मिळेल असा दावा सरकारकडून केला गेला आहे. दिवाळीआधी कर्जमाफी झाली असं दाखवत पाठ थोपटून घेणाऱ्या सरकारने 18 ऑक्टोबरला 8 लाख 40 हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम पोहचेल अशी व्यवस्था केली होती. मात्र चुकीची माहिती, आधार नंबर आणि तांत्रिक चुकांमुळे केवळ 4 हजार शेतकरी नशीबवान ठरले. मुंबईसह सर्व जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात घोषित झालेल्या आणि काहीही त्रुटी नसलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले. त्यानंतर अधिकृत संकेत स्थळावरून यादी काढून घेण्याची नामुष्की सरकारवर आली. इतक्या चुका त्या यादीमध्ये सापडल्या. त्यापुढे जाऊन 25 ऑक्टोबर निर्धारित तारीख होती मात्र या तारखेला ठरवलेल्या 2 लाख 39 हजार शेतकऱ्यांना यादीप्रमाणे 899.12 कोटी रुपये वाटले जाणार होते त्यासाठीचे 392 कोटी रुपये 11 राष्ट्रीयकृत बँकांकडे ट्रान्सफर करण्यात आले..मात्र तांत्रिक अडचणीमुळे पैसे पुढं शेतकाऱ्यांच्या खात्यावर जमा करता आलेले नाहीत..राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीसाठी 20 हजार कोटींची तरतूद केली आहे- त्यामुळे अर्धी अधिक रक्कम तयार आहे पण निर्दोष यादी अद्याप तयार नाही आणि नेमकी यादी कधी पूर्ण होईल याचे उत्तर सरकारच्या संबंधित कोणत्याच विभागाकडे नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 09:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading