शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जीआर जारी

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जीआर जारी

राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना तब्बल ३४ हजार २२ कोटी रुपयांची राज्याच्या इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी देण्याचा जीआर काल जारी करण्यात आला.

  • Share this:

29 जून : राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना तब्बल ३४ हजार २२ कोटी रुपयांची राज्याच्या इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी देण्याचा जीआर  काल जारी करण्यात आला. शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात येणार असून कर्जमाफीसाठी जमिनीच्या मर्यादेची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. कृषी कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात जाहीर केला होता.

जीआरनुसार, कर्जमाफी तसंच इतर प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी शेतकरी कुटुंब हा निकष मान्य करण्यात आला आहे. कुटुंब या व्याख्येत पती, पत्नी आणि १८ वर्षांखालील मुलांचा समावेश असेल. या कर्जमाफीतून आजी-माजी मंत्री व आमदार तसेच धनदांडग्यांना वगळले असून चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि माजी सैनिकांना कर्जमाफीसाठी पात्र ठरवलं आहे.

कर्जमाफी कोणाला मिळणार नाही ?

- आजी-माजी मंत्री, राज्यमंत्री, राज्यसभा सदस्य, आजी-माजी विधानसभा, विधान परिषद सदस्य

- जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य

- केंद्र आणि राज्य सरकारी, निमसरकारी अधिकारी, कर्चमारी, अनुदानित महाविद्यालये आणि शाळांचे प्राध्यापक, शिक्षण, सरकार अर्थसहाय्यित संस्थांचे अधिकारी-कर्मचारी (चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)

- शेतीबाह्य उत्पन्नातून प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्ती

- माजी सैनिक वगळून ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन 15 हजारांपेक्षा जास्त आहे

- 3 लाख रुपयांपेक्षा जास्त ढोबळ उत्पन्न असलेली व्यक्ती

कर्जमाफीच्या जीआरचा अर्थ काय?

१) निकष

व्यक्ती एवजी कुटुंब निकष,

कुटुंबात एकालाच कर्जमाफी मिळणार

आक्षेप

2 जणांच्या नावावर शेती आणि कर्ज असेल

तर बाकीच्यांनी काय करायचं ?

२) निकष

दीड लाखापर्यंत कर्जमाफी यापेक्षा जास्त कर्ज असेल

तर ते कर्ज आधी बँकेत भरा मगच कर्जमाफी

आक्षेप

म्हणजे एखाद्याकडे 3 लाख कर्ज आहे

आधी त्याने बँकेत ते भरावे मग सरकार दीड लाख देईल.

३) निकष

कर्जमाफीसाठी सरकार पैसे उभे करणार, अधिवेशनात बिल आणणार

आक्षेप

म्हणजे कर्जमाफीची रक्कम यायला 3 महिने लागणार

४) निकष

कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला दीड लाखांची सरसकट माफी

आक्षेप

ज्यांनी कर्ज बुडवलं त्याला दीड लाख आणि ज्यांनी भरलं

त्याला 25 हजार मिळणार

निकष

ज्यांना पेरणीसाठी 10 हजार दिले ते माफीच्या रक्कमेतून कापून घेणार

आक्षेप

सरकार 30 लाख, 60 लाख तर कधी 89 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार

असा दावा करतंय. नक्की आकडा काय?

निकष

कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणार

आक्षेप

गावात जर 1000 शेतकरी आहेत त्यापैकी जेमतेम 30 जणांची निकष पूर्ण

करून कर्जमाफी शक्य मग 970 जणांनी करायचं काय?

First published: June 29, 2017, 9:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading