कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही-शरद पवार

कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही-शरद पवार

कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नसली, तरी सरकारच्या या पहिल्या पावलाचं स्वागत केलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय.

  • Share this:

25जून : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नसली, तरी सरकारच्या या पहिल्या पावलाचं स्वागत केलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय.

आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत मांडले. कोणत्याच मागण्या एकाचवेळी पूर्ण होत नसतात, त्यामुळे उर्वरित मागण्यांसाठी आम्ही भविष्यात आग्रह धरु असं सूचक विधानही त्यांनी केलं. शिवाय कर्जमाफी हे एक पाऊल होतं. आता यापुढे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार असल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात कांद्याचं उत्पादन जास्त होतं. जास्त करून जिरायती शेतकरी आहे. त्यामुळे कांदा निर्यात व्हायला हवी, असंही ते यावेळी म्हणाले.

 

First published: June 25, 2017, 3:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading