मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

50 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटीचा टायर अचानक फुटला; पंढरपुरातील चंद्रभागा नदीवर बसचा अपघात

50 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटीचा टायर अचानक फुटला; पंढरपुरातील चंद्रभागा नदीवर बसचा अपघात

कोल्हापूर आगाराची एसटी बस माजलगावहून कोल्हापूरकडे जात असताना हा अपघात झाला. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवर बसचा पुढील टायर फुटल्याने ही घटना घडली. (Solapur Bus Accident)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर 15 सप्टेंबर : पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवरुन जात असताना एसटी बसचा अपघात झाला आहे. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास पंढरपूरच्या अंबाबाई पटांगणाजवळच्या नवीन पुलावर घडली. बसमधील सर्व 50 प्रवाशी सुखरूप आहेत. टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

अखेरचा प्रवासही झाला वाईट! औरंगाबादमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पार्थिवाची अवहेलना

कोल्हापूर आगाराची एसटी बस माजलगावहून कोल्हापूरकडे जात असताना हा अपघात झाला. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवर बसचा पुढील टायर फुटल्याने ही घटना घडली. यात बस पुलाच्या संरक्षक कठड्यावर आदळली. या दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

आज पहाटे सहाच्या सुमारास ही बस निघाली असता अंबाबाई पटांगणातील नवीन पुलावर अचानक बसचे टायर फुटले. यामुळे बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस कठड्याच्या दिशेनं गेली. मात्र, ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे ही बस पुलावर असलेल्या कठड्यावर धडकल्याने मोठा अनर्थ टाळला आहे. या बसमध्ये पन्नास प्रवासी होते. जर या पुलाला लोखंडी बॅरिकेटिंग आणि कठडे नसते तर बस नदीत कोसळली असती.

Car मालकासोबत घडला धक्कादायक प्रकार, दुरुस्त करताना गाडी सुरु झाली आणि... VIDEO व्हायरल

बस चालकानेही सतर्कता दाखवल्यामुळे पन्नास प्रवाशांचा जीव वाचला आहे. या घटनेत कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही.

जम्मू काश्मीरमधूनही बुधवारी एका भीषण अपघाताची बातमी समोर आली होती. यात मिनी बसचा भीषण अपघात झाला. ज्यात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 हून अधिक जण जखमी झाले. जम्मू आणि काश्मीरमधील पुंछमधील सावजियान भागात हा अपघात झाला होता. जखमींना मंडी इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

First published:

Tags: Accident, St bus accident