नवी मुंबई, 6 मार्च : नवी मुंबईतील वाशीमधील 'क्लब नशा' या पबवर नवी मुंबई पोलिसांनी धाड (Police Raid On Pub In Navi Mumbai) टाकली. या धाडीत 150 ते 200 तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वाशीतील (Vashi) पामबिच गॅलरीया या मॉलमध्ये हा पब आहे.
या पबमध्ये सुरू असलेल्या पार्टीत तरुण-तरुणींकडून दारूचं सेवन करण्यात येत होतं. ज्यामध्ये अल्पवयीन मुलेही असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे आणि एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगुडे यांनी या पबवर धाड टाकली.
या धाडीत पबमध्ये आढळलेल्या तरुणांना ताब्यात घेऊन पब मालकावर कारवाई करण्यात आली आहे. एका बाजूला नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई महापालिका जीवाचं रान करून कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पबमध्ये धांगडधिंगा सुरू होता.
हेही वाचा - मुंबईत एकाच दिवशी 2 आत्महत्या, 10 वीत शिकणाऱ्या मुलीने इमारतीवरून मारली उडी
मागील आठवड्यापासून पोलीस आणि महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असताना देखील पब मालक अशा करवायांना धजावत नसल्याने आता नवी मुंबई पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात कोरोनाचे नियम तोडणाऱ्यां 300 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर मास न घालणाऱ्या 10 हजार नवी मुंबईकरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या रडारवर आता नियम तोडणारे पब आणि डान्सबार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळातही पोलिसांकडून अशीच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus