मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

LIVE VIDEO : क्रिकेटच्या मैदानातून धक्कादायक बातमी, फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE VIDEO : क्रिकेटच्या मैदानातून धक्कादायक बातमी, फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नॉन स्ट्राईकवर उभ्या असणाऱ्या फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

नॉन स्ट्राईकवर उभ्या असणाऱ्या फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

नॉन स्ट्राईकवर उभ्या असणाऱ्या फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

जुन्नर, 17 फेब्रुवारी : क्रिकेटच्या भर मैदानात बॅटिंग सुरू असतानाच नॉन स्ट्राईकवर उभ्या असणाऱ्या फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यात बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे स्वर्गीय मयुर चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. दोन दिवस या ठिकाणी क्रिकेटचे सामने सुरू आहेत. आज दुपारी ओझर संघ व जांबुत संघ हा सामना चालू असताना ओझर संघाचा टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू व कॅटवे ओतुर संघाचा एक माजी खेळाडू धोलवड(ता.जुन्नर ) गावचा बाबू नलावडे वय वर्ष 47 हा फलंदाजी करत असताना अचानक मैदानावर हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन कोसळला. अगदी काही क्षणात इतर खेळाडूंनी बाबू नलावडे यांना नारायणगाव येथील डॉ.राऊत यांच्याकडे हलवले. पण त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेमुळे टेनिस क्रिकेट विश्वाला अतिशय जबर धक्का बसला आहे. एखाद्या खेळाडूंचे असे मैदानावर दुःखद निधन होणे यामुळे तालुक्यात व क्रिकेट प्रेमींतून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अलिकडील काळात जीवनशैली आणि आहारात झालेल्या बदलामुळे वरकरणी माणूस कितीही फिट वाटत असला तरीही त्याच्यासोबत कधी काय होईल हे सांगता येत नाही. क्रिकेटर म्हटलं की फिटनेस ही गोष्ट आलीच. मात्र असं असतानाही हृदयविकाराचा झटका येऊन होणाऱ्या खेळाडूंच्या मृत्यूंच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज जुन्नरसारख्या घटनांमुळे आणखीनच अधोरेखित होत आहे.
First published:

Tags: Cricket, Cricket news, Pune (City/Town/Village)

पुढील बातम्या