Home /News /maharashtra /

सिनेमाला लाजवेल असा जालन्यामध्ये दरोडा, 25 लाख रोख आणि 70 लाखांचे सोने लुटतानाचा LIVE VIDEO

सिनेमाला लाजवेल असा जालन्यामध्ये दरोडा, 25 लाख रोख आणि 70 लाखांचे सोने लुटतानाचा LIVE VIDEO

बुलडाणा अर्बन बँकेत (Buldhana Urban Bank) गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास 3  दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकला होता

बुलडाणा अर्बन बँकेत (Buldhana Urban Bank) गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास 3 दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकला होता

बुलडाणा अर्बन बँकेत (Buldhana Urban Bank) गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास 3 दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकला होता.

बीड, 30 ऑक्टोबर : जालना जिल्ह्यातील शहागड येथील बुलडाणा अर्बन बँकेच्या (Buldhana Urban Bank) शाखेवर  फिल्मी स्टाईल दरोडा टाकण्यात आला होता. या सर्व दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पिस्तुलीचा धाक दाखवून तीन दरोडेखोरांनी 25 लाखांची रोख रक्कम व तारण केलेल्या ग्राहकांचे जवळपास 70  लाख रुपयांचे सोने पळवले होते. दिवसाढवळ्या पडलेल्या दरोड्यांने मोठी खळबळ उडाली होती. जालना जिल्ह्यातील शहागड येथील बुलडाणा अर्बन बँकेत (Buldhana Urban Bank) गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास 3  दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकला होता. हा प्रकार घडला तेव्हा बँकेत दोन क्लर्क, दोन कॅशिअर, दोन शिपाई , एक मॅनेजर हजर होते. बंदुकीचा धाक दाखवून तिघे बँकेत आले. नंतर बँकेतील सर्वांना बंदुकीचा धाक दाखवून एका जागेवर बसवले. दरोडेखोर कॅशिअर प्रमोद पुंडे यांना लॉकरकडे घेऊन गेले व रोख रक्कम 25 लाख रूपये व सोने तीन लॉकरमधून अंदाजे 70 लाखांचे सोने घेऊन बँकेच्या बाहेर त्यांची उभा केलेल्या विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन पसार झाले होते. केसांसाठी खर्च केले तब्बल 35 हजार रुपये; आरशात पाहताच ढसाढसा रडू लागली महिला गेवराई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांना गुप्तहेरामार्फत माहिती मिळाली की, गेवराई येथील एका जणाने त्याच्या बीडच्या राहत्या घरी गोणीमध्ये पैसे व सोने लपवून ठेवले आहे. यानंतर संदीप काळे यांनी शहानिशा करुन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड तसंच जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पकडण्यात यश आले असून मुद्दे माल जप्त केला आहे. या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावण्यात गेवराई पोलीस व जालना स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. तर अन्य एक जणाचा शोध पोलीस घेत आहेत अद्याप आरोपीची नावे पोलिसानी उघड केली नाहीत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या