संगमेश्वर, 24 ऑगस्ट : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane arrested) यांना अटक झाल्यामुळे राज्यातील राजकारणाला मोठे वळण मिळाले आहे. उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिल्यामुळे राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्यावेळी राणेंना अटक करण्यात आली तेव्हाचा व्हिडीओ समोर आला आहे. (Union Minister Narayan Rane arrested)
केंद्रात मंत्री झालेले नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू होती. मात्र, महाडमध्ये बोलत असताना राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरला. त्यामुळे सकाळपासून ठिकठिकाणी शिवसैनिकांनी जोरदार आक्रमक होत भाजपची कार्यालय फोडून काढली. ठिकठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे. सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे अटक करण्यात आली.
आदरणीय राणे साहेब जेवण करत असताना, यांची मुजोरी आणि ठोकशाही सुरूच! ठोकशाही करणाऱ्या आणि पोलिसजीवी ठाकरे सरकारने कायद्याने चालावे! या भकास सरकार चा जाहीर निषेध!!@MeNarayanRane @NiteshNRane @meNeeleshNRane pic.twitter.com/7q1etySkgq
— Prasad Lad (@PrasadLadInd) August 24, 2021
त्यामुळे गोळवली येथील रा.स्व. संघाच्या सेवा प्रकल्पाची पाहाणी करत असताना रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले. राणे आपल्या दोन्ही मुलं आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत बंद खोलीत बसून होते. तर पोलिसांचा मोठा फौजफाटा बाहेर उभा होता. पोलीस अधिक्षकांनी राणेंना सोबत येण्याची विनंती केली, पण जेव्हा आतमध्ये मोठा गोंधळ उडाला. निलेश राणे यांनी पोलिसांना तुमच्याकडे अटक वॉरंट आहे का असं म्हणत हुज्जत घातली, त्यावेळी राणे जेवत असताना उठले. त्यानंतर राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
अटकेनंतर नारायण राणे यांचं ब्लड प्रेशर आणि शुगर वाढली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावं असा सल्ला डॅाक्टरांनी पोलीस अधिक्षक यांना दिला आहे. तर, नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले असून त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे.
अंडं खाऊन फेकू नका कवच; लांबसडक केसांसाठी तयार करा हेयर मास्क
'राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांना बाहेर गाडीतच बसवून ठेवले आहे. त्यांचा रक्तताप वाढला असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज आहे परंतु त्यांना वैद्यकीय मदतही दिली जात नाहीये असा आरोप प्रसाद लाड यांनी केला.
तसंच, नारायण राणे यांना नुसतेच बसवून ठेवले आहे. ना कुठली कारवाई करत आहेत ना कसली माहिती देत आहेत. गोळवली प्रकल्पात नारायण राणे यांना पोलिसांनी भरल्या ताटावरून जेवताना अर्धवट उठवले असेही ते म्हणाले.
नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.