• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO पाण्यात गाडी घालण्याचं धाडस पडलं महागात; कारसह नदीत वाहून गेला तरुण
  • LIVE VIDEO पाण्यात गाडी घालण्याचं धाडस पडलं महागात; कारसह नदीत वाहून गेला तरुण

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2019 03:58 PM IST | Updated On: Aug 6, 2019 03:58 PM IST

    चंद्रपूर, 6 ऑगस्ट : चंद्रपूरमधील इरई नदीत कारसह युवक वाहून गेला. सूरज बिपटे असं वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. चंद्रपूर शहराजवळील भटाळी - दुर्गापूर मार्गावर ही घटना घडली. भटाळी गावाजवळील नदीवरील या पुलाची उंची अतिशय कमी आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे गेल्या एका आठवड्यापासून हा पूल बंद आहे. मात्र या युवकाने अतिरेकी धाडस करत पाण्यात गाडी घातली. सूरज बिपटे हा युवक भटाळीतल्या कोळसा खाणीत कर्मचारी होता. आज सकाळी शिफ्ट संपल्यावर हा तुकुम इथल्या आपल्या घराकडे येण्यासाठी कारने निघाला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी