मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हिंगोलीत पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या सोयाबीनच्या गंजीला अडकून मासेमारी करणारा गेला वाहून, नागरिकांनी वाचवले प्राण, पाहा LIVE VIDEO

हिंगोलीत पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या सोयाबीनच्या गंजीला अडकून मासेमारी करणारा गेला वाहून, नागरिकांनी वाचवले प्राण, पाहा LIVE VIDEO

हिंगोलीत पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या सोयाबीनच्या गंजीला अडकून मासेमारी करणारा गेला वाहून, नागरिकांनी वाचवले प्राण, पाहा LIVE VIDEO

हिंगोलीत पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या सोयाबीनच्या गंजीला अडकून मासेमारी करणारा गेला वाहून, नागरिकांनी वाचवले प्राण, पाहा LIVE VIDEO

farmer swept away in flood water LIVE VIDEO: हिंगोलीत पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या सोयाबीनच्या गंजीला अडकून मासेमारी करणारा व्यक्ती गेला वाहून आणि मग...

हिंगोली, 17 ऑक्टोबर : नदीमध्ये मासे पकडत असताना, वाहून आलेल्या सोयाबीन (Soybean) गंजीमध्ये, मासेमारांची तराफा अडकल्याने, गंजी सोबत पाच किलोमीटर,नदीमध्ये फरफटत जाण्याचा प्रकार हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात घडला असून, परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रयत्नानंतर, या मासे मराचा जीव वाचला आहे. काल रात्रीपासून हिंगोली शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, तर धरण क्षेत्रातही चांगलाच पाऊस पडला आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी आणि नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरगाव परिसरामध्ये देखील, कयाधू नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून, या नदीमध्ये सोयाबीनची गंजी वाहून जात होती. त्याच वेळी नदीमध्ये मासे पकडण्यासाठी उतरलेल्या, रामण पावडे याची थर्माकोलचा तराफा या गंजीला अडकला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, त्याला गंजी चा आधार घ्यावा लागला. पाण्याचा प्रवाह अधिक तीव्र असल्याने, रामण हा डोंगरगाव पासून, शेवाळेपर्यंत जवळपास पाच किलोमीटर नदीमध्ये वाहून गेला. शेवटी शेवाळे गावाच्या जवळ, गावकरी आणि शेतकऱ्यांनी प्रयत्न करून, त्याला नदीतून बाहेर काढले. यामुळे त्याचे प्राण वाचू शकले. काल दुपारपासूनच राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. हिंगोली, परभणी, यवतमाळ, जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आल्याचं पहायला मिळत आहे. पावसाचा हा जोर आजही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परभणीत मुसळधार पावसात बैलजोडी गेली वाहून गेल्या महिन्यात परभणीत झालेल्या मुसळधार पावसात बैलजोडी वाहून गेली होती. परभणी जिल्ह्यात झालेल्या या पावसामुळे, नदी आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या पुरामध्ये वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या. सेलू तालुक्यातील कुपटा या गावात बैलजोडी पाण्यामध्ये वाहून गेल्याचा प्रकार समोर आला होता. मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यातील कुपटा गावात रस्ता ओलांडणारी एक बैलजोडी पूराच्या पाण्यात वाहून गेली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरश: काटा येतो. बैलजोडी वाहून जातानाचा प्रकार ताजा असतानाच याच गावातील दोन युवक या पाण्यामधून रस्ता पार करतानाचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला असताना युवक या पाण्यामधील रस्ता पार करायला सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यभागी आल्यावर, प्रवाहाचा अंदाज आल्याने, या युवकांनी स्वतः नदीमध्ये उडी घेतली आणि काही अंतरावर पोहत जाऊन, स्वतःचा जीव वाचवला. परंतु अशा प्रकारचा स्टंट जीवावरही बेतू शकतो. प्रशासनाकडून वारंवार, पूरपरिस्थिती मध्ये स्वतःचा बचाव करा, नदी नाल्यांना पार करू नका, अशा सूचना दिल्या जात असतानाही, जिल्ह्यात अशा घटना काही थांबायचे नाव घेत नाहीत. अशा प्रकारच्या धाडसामुळे जीवितहानी देखील होऊ शकते, यामुळे नागरिकांनी सतर्क होऊन स्वतःचं संरक्षण करणे गरजेचे आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Live video, Maharashtra, Rain

पुढील बातम्या