सोलापुरात मोहोळजवळ अग्नितांडव, कंटेनरला धडक देऊन केमिकल टँकरला भीषण आग LIVE VIDEO

आगीची तीव्रता इतकी भीषण आहे की, अपघातस्थळावरून दोन किलोमीटर दूर अंतरावर गाड्यांना थांबवण्यात आल्या आहे.

आगीची तीव्रता इतकी भीषण आहे की, अपघातस्थळावरून दोन किलोमीटर दूर अंतरावर गाड्यांना थांबवण्यात आल्या आहे.

  • Share this:
सोलापूर, 22 नोव्हेंबर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळजवळ  केमिकल टॅंकर  ( chemical tanker fire) आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या भीषण घटनेमुळे महामार्गावरील दोन किलोमीटर अंतरावर वाहनं थांबवण्यात आली आहे. आज सकाळी मोहोळमधील पिंपरी इथं ही घटना घडली. भरधाव कंटेनर आणि केमिकल टँकरची समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर केमिकलने भरलेला टँकर महामार्गावर उलटला. त्यामुळे काही क्षणात त्याने पेट घेतला. टँकरने भीषण भेट घेतल्यामुळे घटनास्थळी कंटेनरही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे. त्यामुळे कंटेनरलाही आग लागली आहे. आगीची तीव्रता इतकी भीषण आहे की, अपघातस्थळावरून दोन किलोमीटर दूर अंतरावर गाड्यांना थांबवण्यात आल्या आहे. आगीची दाहकता इतकी भीषण आहे की, 500 मीटरच्या परिसरात त्याची उष्णता जाणवत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहे. खबरदारी म्हणून मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.  अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल आहे. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे. महामार्गावरील वाहतूक ही वळवण्यात आली आहे. कोरोनामुळे 10 वर्षांच्या मुलाचे आतडे सडले, 3 महिन्यात केल्या 4 शस्त्रक्रिया या अपघात कंटेनर आणि टँकरमधील दोन्ही वाहनचालकांनी उड्या टाकून आपला जीव वाचवला. पण,  टँकर चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला  तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. मोहोळ येथील साखर कारखान्यात दुर्घटना, 2 कामगार ठार दरम्यान, मोहोळ येथीलच लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो इंड्रस्ट्रीज कारखान्यात बायोडायजेस्टरच्या टाकी कोसळून फुटली. ही घटना रविवारी पहाटे 3.30 च्या सुमारास  घडली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आयुर्वेदिक डॉक्टरांनाही शस्त्रक्रिया करण्यास परवानगी कारखान्यात काम सुरू असताना अचानक पहाटे बायोडायजेस्टरची टाकी खाली कोसळली. त्यामुळे घटनास्थळावर काही कर्मचाऱ्यांनी धावाधाव केली. टाकी खाली कोसळल्यानंतर फुटली. टाकी फुटल्यानंतर मिथेन गॅस आणि द्रवरुप लिक्विड पदार्थ बाहेर पडला. त्यामुळे घटनास्थळावर वायू गळती झाली. यात काम करणारे 10 कर्मचारी सापडले. घटनास्थळावर दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले. यात ज्योरीराम दादा वगरे (वय 45, राहणार बिटले, मोहोळ ) आणि सुरेश अंकुश चव्हाण  (वय 22, रा. बिटले, मोहोळ) या दोन्ही कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर आठ कामगारांना सोलापूर सिध्देश्वर हॉस्पिटलमध्ये  दाखल केले आहे. या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published: