Home /News /maharashtra /

काळजाचा ठोका चुकवणारी घटना! दुचाकीस्वारावर झाड कोसळलं आणि..., LIVE VIDEO

काळजाचा ठोका चुकवणारी घटना! दुचाकीस्वारावर झाड कोसळलं आणि..., LIVE VIDEO

Tree falls on Bike rider: बदलापूर शहरात एका दुचाकीस्वारावर अचानक झाड कोसळल्याची घटना घडली आहे.

बदलापूर, 25 जून: बदलापुरात (Badlapur) रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी चालकाच्या अंगावर झाड (Tree fall on biker) पडल्याची घटना घडली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेतून हा दुचाकीस्वार बचावला आहे. दुचाकीस्वाराच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (LIVE VIDEO a tree falls on bike rider in Badlapur incident caught in camera) मिळालेल्या माहितीनुसार, रशीद मुल्ला हे बदलापूर पश्चिम भागातील मानव पार्क भागातून कामानिमित्त बेलवली येथे दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी मानव पार्क सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये झाड तोडण्याचे काम सुरू होते. रशीद मुल्ला यांची बाईक कंपाऊंडच्या शेजारी आली त्याचवेळी झाडाची मोठी फांदी रशीद यांच्या अंगावर पडली. डोंबिवलीत विचित्र अपघात; घंटागाडी खाली चिरडल्याने महिलेचा मृत्यू, अंगावर काटा आणणारा VIDEO अंगावर झाडाची भलीमोठी फांदी पडल्याने रशीद मुल्ला हे दुचाकीवरून खाली पडले आणि त्याच्या डोक्याला मार लागला. सध्या रशीद यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिकेची कोणतीही परवानगी न घेता झाड तोडण्याचे काम सुरू असल्याचा आरोप रशीद मुल्ला यांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी लकुम अर्जुन, संतोष नाईक आणि इतर सोसायटीच्या सदस्यांवर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत धावती बीएमडब्ल्यू कार जळून खाक धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना मुंबई शहरात घडली आहे. आलिशान कार म्हणून ओळख असलेल्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. ही घटना मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर घडली आहे. द बर्निंग कारचा थरार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Badlapur, Shocking video viral

पुढील बातम्या