सत्तास्थापना LIVE : शिवसेनेचे आमदार दुसरीकडे हलण्याच्या तयारीत

सत्तास्थापना LIVE : शिवसेनेचे आमदार दुसरीकडे हलण्याच्या तयारीत

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सेनाभवनात आयोजित करण्यात आली होती. ठरलंय तेवढं द्या या मागणीवर शिवसेना ठाम आहे.

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : सत्तास्थापनेचा तिढा अजून सुटला नसल्याने आमदारांची फोडाफोडी होईल, अशी भीती अनेक पक्षांना वाटत आहे. काँग्रेसने तसे थेट आरोप केले, तर शिवसेनेनं कालपासून आमदारांना बांद्र्याच्या रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण आता तिथूनही ते दुसरीकडे हलणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. रंगशारदाच्या बाहेर बस तैनात ठेवण्यात आल्या आहेत आणि उद्धव ठाकरेसुद्धा रंगशारदाकडे रवाना झाले आहेत. या आमदारांना आता कुठे नेणार याविषयी अजून स्पष्टता नाही. वरळीतल्या एका हॉटेलमध्ये हलवणार असल्याची चर्चा आहे.

"संवाद साधायला सोयीचं व्हावं म्हणून आमदारांना एकत्र ठेवलं", असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले. आमदार निवासाचं काम सुरू आहे, तिथे सोय होऊ शकली नाही, असं कारण शिंदे यांनी दिलं आहे. रंंगशारदात खोल्यांच्या संख्येचा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

शुक्रवारी दुपारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सेनाभवनात आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं.

संबंधित वृत्त - मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना 3 वेळा फोन, मातोश्रीवरून मिळालं असं उत्तर!

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते आणि आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.

"शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही जनतेच्या मनातली इच्छा आहे." सत्तास्थापनेच्या वाटाघाटींपेक्षा शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यायचा उद्धव यांचा निर्णय आहे. म्हणून त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती, असं शिंदे म्हणाले.

संबंधित वृत्त -उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का, मुंबईत पोहोचलेले नितीन गडकरी म्हणाले...

अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने तालुकास्तरावर शिवसेनेचं मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश उद्धव यांनी या बैठकीत दिले.

सत्तास्थापनेचा दावा करणार का या प्रश्नावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, "उद्धव ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. सेनेच्या सर्व आमदारांनी यासंबंधीचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंकडे दिले आहेत."

----------------------

अन्य बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल KBC चा माफीनामा, पाहा VIDEO

महाराष्ट्राची सत्तास्थापना नाही तर 'हा' मुद्दा अमित शहांच्या टार्गेटवर

भाजप-सेनेच्याच नाही तर क्रिकेट प्रेमींच्याही नागपूरकडे नजरा

First published: November 8, 2019, 2:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading