• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live updates : भाजपची उद्या बैठक, शपथविधीबाबत निर्णय होणार

Live updates : भाजपची उद्या बैठक, शपथविधीबाबत निर्णय होणार

कोरोना, राजकीय घडामोडी आणि इतर बातम्यांचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 30, 2022, 00:09 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  0:7 (IST)

  - उद्या सकाळी अकरा वाजता भाजपाच्या प्रमुख नेत्यांची सागर या निवासस्थानी बैठक होईल

  - महाराष्ट्राचे प्रभारी सीटी रवी देखील या बैठकीला उपस्थित राहतील

  - या बैठकीनंतरच शपथविधीचा मुहूर्त आणि विधिमंडळ पक्षाची बैठक कधी घ्यायची याचा निर्णय होईल

  - तूर्त भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

  23:19 (IST)

  एकनाथ शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीहून गोव्यात
  शिंदे गटाच्या आमदारांचा सध्या पणजीत मुक्काम 

  23:15 (IST)

  उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत राजभवनाकडे
  राज्यपाल कोश्यारींचं उद्धव ठाकरेंना आमंत्रण
  'महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत...'
  'काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळा'
  राज्यपाल उद्धव ठाकरेंना अधिकृत पत्र देणार 

  23:12 (IST)

  - मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत राजभवनाकडे निघाले
  - उद्धव ठाकरे सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री

  22:11 (IST)

  - भाजप सरकारचा 1 जुलैला शपथविधी होणार असल्याची माहिती

  22:9 (IST)

   मातोश्रीवर सामसूम
  - एकही शिवसैनिक नाही की कोणी नेता
  - रस्त्यावरील वाहतूक सामान्य
  - मातोश्रीत उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे आणी फक्त ठाकरे कुटुंबीय
  - मातोश्री बाहेर फक्त पोलीस आणी पत्रकार

  21:30 (IST)

  - अनिल परब राजभवनाच्या दिशेला निघाले

  21:28 (IST)

  - उद्धव ठाकरे थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार
  - रात्री साडेनऊ वाजता जनतेशी संवाद साधतील

  21:25 (IST)

  - नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना फ्लोर टेस्टसाठी परवानगी मिळाली आहे
  - दोन्ही नेते ईडीच्या कस्टीमध्ये येणार आणि मतदान करुन परत जाणार

  19:16 (IST)

  - मंत्रीमंडळ बैठक आटोपून उद्धव ठाकरे त्यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल
  - सोबत आदित्य ठाकरे आणी अनिल परब
  - जातानाही होते तिघे एकाच गाडीत
  - येतानाही आले एकाच गाडीत

  शिवसेनेच्या उरलेल्या सर्व आमदारांचा मुक्काम आज ट्रायडंटवरच असेल. उद्या बहुमताच्या चाचणीसाठी शिवसेनेचे आमदार हॅाटेल ट्रायडंटमघून निघणार आहेत. सर्व आमदारांना हॅाटेलवर पोहचवण्याचे आदेश पक्षानं दिले आहेत.