• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE Updates : शिवसेनेच्या आमदारांची आज 7 वाजता मातोश्रीवर तातडीची बैठक

LIVE Updates : शिवसेनेच्या आमदारांची आज 7 वाजता मातोश्रीवर तातडीची बैठक

कोरोना, राजकीय घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 28, 2022, 18:18 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  23:36 (IST)

  गुवाहाटीतील आमदार उद्या दु.12 वा. निघणार
  बंडखोर आमदार विशेष विमानानं निघणार
  मात्र मुंबईलाच की दुसरं लोकेशन? हे गुपित 

  23:20 (IST)

  सत्तासंघर्षानंतर राजकीय घडामोडींना वेग
  देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट
  भाजपकडून राज्यपालांना बहुमत चाचणीसाठी पत्र
  'बंडखोरांच्या याचिकेची प्रतही राज्यपालांना दिली'
  'राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश द्यावे'
  'राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा'
  'मविआ'नं बहुमत सिद्ध करावं, भाजपची मागणी
  '39 आमदारांचा राज्य सरकारला पाठिंबा नाही'
  'मविआ' अल्पमतात असल्याचा भाजपचा दावा
  'मविआ'नं बहुमत सिद्ध करावं - देवेंद्र फडणवीस

  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची राजभवनात घेतली भेट. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपालांनी द्यावे, भाजपची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी

  21:51 (IST)

  आताची सर्वात मोठी राजकीय बातमी
  सत्तासंघर्षानंतर राजकीय घडामोडींना वेग
  दिल्लीवारीनंतर फडणवीस थेट राजभवनवर
  भाजपचे महत्त्वाचे नेते राज्यपालांच्या भेटीला
  देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा राजभवनवर
  आशिष शेलार, प्रवीण दरेकर राजभवनवर
  अमित शाह, नड्डांनंतर राज्यपालांच्या भेटीला
  दिल्लीवारीनंतर फडणवीस थेट राजभवनवर
  फडणवीसांच्या दिल्लीवारीनंतर वेगवान हालचाली 

  18:39 (IST)

  उद्या पुन्हा राज्य मंत्रिमंडळांची बैठक
  लागोपाठ दुसऱ्या दिवशी कॅबिनेट 

  18:35 (IST)

  'झुकणार नाही, महाराष्ट्र विकणार नाही'
  शिवसेनेचं सोशल मीडियावर कॅम्पेन
  'दिल्लीतून महाराष्ट्रावर कुरघोडीचे प्रयत्न'
  'लढवय्ये मावळे मनसुबे उधळून लावतील' 

  17:52 (IST)

  अलिबाग शिवसेना मेळाव्यातून संजय राऊत
  'आपल्याला करेक्ट कार्यक्रम करायचा आहे'
  'काहींकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू'
  'सेनेच्या अंगावर येण्याची हिंमत करू नका'
  शिवसेना जागेवर, आमदार वॉकरवर - राऊत
  अलिबागमध्येही झाडी, डोंगर, हॉटेल - राऊत
  'ठाण्याच्या भाईला इथले दादा भारी पडतील'
  मी घाबरत नाही, मला अटक करा - राऊत
  'अटक केली तरी गुवाहाटीत जाणार नाही'
  आम्ही आमचा भगवा सोडणार नाही - राऊत
  आम्हाला हिंदुत्व शिकवू नये - संजय राऊत
  शिंदेंसोबतचे 22 जण इतर पक्षातील - राऊत
  'त्या' 22 जणांचा हिंदुत्वाशी काय संबंध? - राऊत
  रस्त्यावर हे गद्दार फिरायला नकोत - राऊत
  'ईडीपासून वाचण्यासाठी आमदार गुवाहाटीत'
  'गुवाहाटीत आमदारांना गुलाम म्हणून ठेवलं'
  पळपुट्यांसाठी केंद्रानं सुरक्षा दिली - राऊत
  'भाजपमुळेच शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत'
  'मुंबईत या, उद्धव ठाकरेंसमोर बसून सांगा'
  ठाकरेंना वगळून शिवसेना होत नाही - राऊत
  जिथे ठाकरे तिथे शिवसेना - संजय राऊत
  बंडखोरांना किंमत मोजावी लागणार - राऊत
  'गद्दारांना क्षमा नाही, चुकीला माफी नाही'
  काही झालं तरी झुकेंगे नही - संजय राऊत 

  17:2 (IST)

  खासदार संजय राऊतांना ईडीचं दुसरं समन्स
  राऊतांना एक जुलैला हजर राहण्याचे आदेश

  17:2 (IST)

  'मुख्यमंत्र्यांचं आमदारांना भावनिक आवाहन'
  मुख्यमंत्री असावा उद्धव ठाकरेंसारखा - सुप्रिया
  मला उद्धव ठाकरेंचा अभिमान - सुप्रिया सुळे
  ठाकरे कुटुंबाशी भावनिक राहतं - सुप्रिया सुळे
  राजकारणात यश, अपयश येत राहतं - सुप्रिया
  नात्यांमध्ये भांड्याला भांड लागतंच - सुप्रिया सुळे
  कुटुंबात कुरबुरी होतच राहतात - सुप्रिया सुळे
  'जे राष्ट्रवादीला दोष देतायत ते राष्ट्रवादीत होते'
  'चर्चेतून मार्ग निघतो, चर्चा तर झालीच पाहिजे'
  ईडी आता गावागावापर्यंत पोहोचली - सुप्रिया 

  17:1 (IST)

  'काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, एकदम ओके'
  गुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये शहाजी बापूंना 'वन्स मोअर'
  शिंदे गटाकडून शहाजी बापू पाटील यांचं कौतुक 

  17:1 (IST)

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं गुवाहाटीतील शिवसेना आमदारांना आवाहन; आपल्यातील बरेच जण संपर्कात असून आपण आजही मनानं शिवसेनेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, आपण माघारी येऊन माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, शिवसेनेनं जो मान-सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

  मुख्यमंत्र्यांचं बंडखोर आमदारांना आवाहन
  'गुवाहाटीतील सेना आमदारांनी माघारी यावं'
  आपण आजही मनानं शिवसेनेत - मुख्यमंत्री
  'मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही'
  मी आपल्या भावनांचा आदर करतो - मुख्यमंत्री
  मी तुमचा कुटुंबप्रमुख म्हणून काळजी - मुख्यमंत्री
  'शिवसैनिक, जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा'
  आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू - मुख्यमंत्री
  कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका - मुख्यमंत्री
  'सेनेनं दिलेला मान-सन्मान कुठेही मिळणार नाही'
  समोर येऊन बोला, आपण मार्ग काढू - मुख्यमंत्री  

  कोरोना, राजकीय घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स