• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE Updates : मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात कोसळली दरड, वाहतूक ठप्प

LIVE Updates : मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात कोसळली दरड, वाहतूक ठप्प

कोरोना, राजकीय घडामोडी आणि इतर बातम्यांचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 03, 2022, 00:01 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  23:59 (IST)

  खेड :

  - मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोसळली दरड

  - रात्री 11 वाजता दरड आली महामार्गावर 

  - परशुराम घाटातून वाहतूक ठप्प 

  - महामार्गावरील दरड हटवण्याचे काम सुरू 

  - मुसळधार पाऊस सुरू

  23:18 (IST)

  मुख्यमंत्र्यांसह आमदार ताज प्रेसिडेंटमध्ये
  भाजप - शिंदे गटाची संयुक्त बैठक संपली
  शिंदे-फडणवीसांचं आमदारांना मार्गदर्शन
  'आपल्यासोबत बाळासाहेबांचे सच्चे सैनिक'
  'महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव मिळवून द्यायचंय'
  'आज खऱ्या अर्थानं भाजप-सेना युतीचं सरकार'
  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
  बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं - शिंदे
  'कठीण कामं सोपी करणं हे फडणवीसांना ठाऊक'
  'शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी दिली'
  मुख्यमंत्री शिंदेंचे फडणवीसांबद्दल गौरवोद‌्गार 

  23:8 (IST)

  मुख्यमंत्र्यांसह आमदार ताज प्रेसिडेंटमध्ये
  भाजप - शिंदे गटाची संयुक्त बैठक संपली
  शिंदे-फडणवीसांचं आमदारांना मार्गदर्शन
  'आपल्यासोबत बाळासाहेबांचे सच्चे सैनिक'
  'महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव मिळवून द्यायचंय'
  'आज खऱ्या अर्थानं भाजप-सेना युतीचं सरकार'
  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
  बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं - शिंदे
  'कठीण कामं सोपी करणं हे फडणवीसांना ठाऊक'
  'शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी दिली'
  मुख्यमंत्री शिंदेंचे फडणवीसांबद्दल गौरवोद‌्गार 

  21:15 (IST)

  शिंदे गटातील आमदार गोव्याहून मुंबईत
  शिंदे गटाचे आमदार 11 दिवसांनी मुंबईत
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आमदारांसोबत
  मुख्यमंत्र्यांसह आमदार ताज प्रेसिडेंटकडे
  शिंदे गटाच्या आमदारांसाठी विशेष कॉरिडोर
  विनाअडथळा 50 आमदारांची बस सुसाट
  विमानतळ ते ताज प्रेसिडेंटपर्यंत पोलीस बंदोबस्त
  भाजप आणि शिंदे गटाची संयुक्त बैठक होणार
  उपमुख्यमंत्री फडणवीस बैठकीसाठी 'ताज'मध्ये
  शिंदे-फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करणार
  'काय सुरत, काय गुवाहाटी, काय गोवा, काय मुंबई'
  मुंबईतलं हाटिल, समुद्र... एकदम 'ओक्के'मध्ये 

  20:47 (IST)

  अमरावती - व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखेर अमरावती पोलिसांच्या ताब्यात; शेख इरफान शेख रहीमला नागपूरमधून पोलिसांनी केली अटक; उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपी अटकेत; सर्व आरोपींना 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी; तब्बल 12 दिवसांनंतर उमेश कोल्हे हत्याकांडाची उकल 

  20:25 (IST)

  गोव्यातील ताज हॉटेलमधून 3 जणांना अटक
  अटक केलेले हरियाणा, उत्तराखंडचे रहिवासी
  बनावट ओळखपत्र वापरून राहिल्यानं अटक
  शिंदे गटाचंही याच हॉटेलमध्ये होतं वास्तव्य 

  18:26 (IST)

  अण्णा हजारेंनी मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
  एकनाथ शिंदेंसोबत व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा
  अण्णांच्या मुख्यमंत्र्यांसह सहकाऱ्यांना शुभेच्छा

  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद; अण्णा हजारेंकडून 

  मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा 

  18:0 (IST)

  सांगली - म्हैसाळ हत्याकांड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; वनमोरे कुटुंबाला मांत्रिकानं 9 बाटल्यांतून दिलं विषारी औषध प्यायला; हत्याकांडाआधी काळ्याजादूचा पार पडला विधी; गुप्तधन प्राप्तीसाठी मांत्रिकाला वनमोरे कुटुंबानं वारंवार दिले पैसे मात्र गुप्तधन मिळत नसल्यानं पैसे परत देण्यासाठी वनमोरे कुटुंबाकडून मांत्रिकाकडे सुरू होता तगादा; हत्याकांडाआधी वनमोरे कुटुंबानं लिहिलेली आत्महत्या चिठ्ठीची प्रत मांत्रिकाच्या घरात सापडली 

  16:50 (IST)

  अमरावती - व्यावसायिक उमेश कोल्हे हत्येप्रकरणी अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंग यांची चौकशी करून कारवाई करण्याची अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे मागणी; पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंग यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा खासदार नवनीत राणा यांचा आरोप 

  16:50 (IST)

  अमरावती - व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरण
  एनआयएच्या नंतर महाराष्ट्र एटीएसही अमरावतीत

  अमरावती - व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरण
  हत्या प्रकरणातील सहावा आरोपी वेटरनरी डॉक्टर
  कोल्हे हत्या प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपी अटकेत
  सर्व आरोपींना 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

  उमेश कोल्हे हत्येप्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा
  'नुपूर शर्माप्रकरणी पोस्ट व्हायरल केल्यानंच हत्या'
  अमरावतीचे डीसीपी विक्रम साळींची कबुली  

  कोरोना, राजकीय घडामोडी आणि इतर बातम्यांचे अपडेट्स