पिंपरी-चिंचवडमधून सगळ्यात मोठी बातमी
राज्य पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार
भरतीत गैरप्रकार करणारे 6 रॅकेट उद्ध्वस्त
विविध जिल्ह्यांमधून 5 आरोपींना अटक
आरोपींकडून 76 मोबाईल केले हस्तगत
66 स्पाय डिव्हाईस, 22 वाकीटॉकी जप्त
11 लाखांची रोकडही पोलिसांनी केली जप्त
घोटाळा करणाऱ्या 51 जणांवर दोषारोपपत्र
'एसी लोकलच्या मुद्यावर आज जीएमची भेट घेतली'
त्यांना काही पर्याय सुचवले आहेत - श्रीकांत शिंदे
लोकांना त्यांच्या साध्या लोकल हव्यात - श्रीकांत शिंदे
'त्यांना त्या देऊन त्यानंतर अतिरिक्त एसी लोकल द्या'
2-3 दिवसांत तोडग्याचं आश्वासन - श्रीकांत शिंदे
सर्व लोकल या 15 डब्यांच्या करा - श्रीकांत शिंदे
हा प्रश्न लवकर सोडवला जाईल - श्रीकांत शिंदे
'तसं न झाल्यास आम्ही जनतेसोबत आंदोलन करू'
- एक सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवा, अन्यथा खड्डे असलेल्या भागातील स्कूल बस बंद करण्याचा स्कूल बस मालकांचा निर्णय
- मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे पडलेले असताना ज्या भागात खड्डे आहेत अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता त्या भागातील स्कूलबस जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत बंद करण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनेने घेतला आहे
- खड्डे बुजवण्यासाठी एक सप्टेंबर पर्यंत स्कूल बस मालकांकडून वाट पाहिली जाईल.
- मात्र तोपर्यंत जर खड्डे बुजवले गेले नाहीत तर एक सप्टेंबरपासून मात्र खड्डे असलेल्या भागातील स्कूल बस या खड्डे बुजवेपर्यंत बंद केल्या जातील
- मुंबईतील विविध भागातील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना सोडणाऱ्या स्कूलबस विरोधात अनेक तक्रारी पालकांनी केल्या आहेत
- खड्ड्यांमुळे स्कूलबस टायर पंक्चर होणे, या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यास किंवा घरी सोडण्यास उशीर होणे, अशा प्रकारच्या समस्यांना स्कूलबस चालकांना मालकांना सामोरे जावे लागत आहे
- पालकांना खड्ड्यांचा कारण देऊन सुद्धा पालकांच्या तक्रारी वारंवार सुरू आहेत
- त्यामुळे खड्डे बुजवल्यानंतरच स्कूल बस सेवा सुरु गुरू अशा प्रकारचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतला आहे
- यासंदर्भात शाळा प्रशासन परिवहन विभाग व राज्य सरकारला अशा प्रकारचं पत्रक या संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर देण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे
राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. राजकीय घडामोडींचे सगळे अपडेट्स