LIVE NOW

पोलादपूर घाटात बस दरीत कोसळून 33 ठार,रात्रीही बचावकार्य सुरू

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात 800 फूट खोल दरीत बस कोसळून 33 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Lokmat.news18.com | July 28, 2018, 10:51 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated July 28, 2018
auto-refresh

Highlights

Load More
रायगड, 28 जुलै : रायगडच्या पोलादपूर येथे मोठा भीषण अपघात झाला आहे. पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात 800 फूट खोल दरीत बस कोसळून 33 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आंबेनळी घाटात ही बस जवळपास 8०० फूट खोल दरीत कोसळली. आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीनं इथं बचावकार्य सुरू आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचाऱ्यासह 2 चालक या बसमधून महाबळेश्वरला सहलीला निघाले होते. सध्या तिथे पुण्याहून एनडीआरएफची टीमही दाखल झालीये. या बसमधल्या प्रवाशांपैकी सहाय्यक कृषी अधिक्षक प्रकाश सावंत देसाई यांनी या दरीतून वर येऊन अपघाताची माहिती दिली. कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्वरला सकाळी 6.30 च्या सुमारास निघाली होती. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस जोडून आल्यामुळे महाबळेश्वरला ही सहल निघाली होती. यासाठी एक खासगी बस भाड्याने घेण्यात आली होती. एकूण 32 जण या सहलीत सहभागी झाले होते. सकाळी 10.30 च्या सुमारास बस आंबेनळी घाटात पोहोचली. रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगार तयार करून ठेवले होते त्यावर बसचे चाक सरकले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरली. काही कळायच्या आतच बस दरीत कोसळली. बस जेव्हा दरी घसरत होती तेव्हा मी बसमधून बाहेर फेकला गेलो आणि वाचलो.        
corona virus btn
corona virus btn
Loading