Nandurbar Result: उत्तर महाराष्ट्रात पहिला विजय, भाजपच्या विजयकुमारांनी मारली बाजी

काँग्रेस उमेदवार उदेसिंग पाडवी यांच्या लेटर हेडवर डॉ. विजयकुमार गावित यांना पाठिंबा असणाऱ्या खोटं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 12:25 PM IST

Nandurbar Result: उत्तर महाराष्ट्रात पहिला विजय, भाजपच्या विजयकुमारांनी मारली बाजी

नंदुरबार, 24 ऑक्टोबर: नंदुरबारमध्ये भाजपला यश मिळाले आहे. भाजपचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उदेसिंग पाडवी यांचा पराभव केला. डॉ. विजयकुमार यांची कन्या डॉ. हिना गावित या भाजपच्या खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. राज्यातील अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. निकालाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उत्तर महाराष्ट्रात महाआघाडीला धोबीपछाड देत महायुती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता लागली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात भाजप आघाडीवर तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पिछाडीवर दिसत आहे. भाजप 13, शिवसेना 7, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 7 आणि अपक्ष 3 असे चित्र आहे. नंदुरबार विधानसभा मतदार संघातून डॉ. विजयकुमार गावित रिंगणात होते. ही जागा आदिवाली बहुल आहे. 338781 मतदार संख्या असलेल्या मतदार संघात 170583 पुरुष आणि 168191 महिला मतदार आहेत.

खोटं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

काँग्रेस उमेदवार उदेसिंग पाडवी यांच्या लेटर हेडवर डॉ. विजयकुमार गावित यांना पाठिंबा असणाऱ्या खोटं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे खळबळ उडाली होती. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी भाजपचे हे कारस्थान असल्याचा आरोप उदेसिंग पाडवी यांनी केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 62.1 टक्के तर 2009 च्या निवडणुकीत 67.73 टक्के मतदान झाले होते. 2014 मध्ये विजयकुमार गावित यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 27118 मतांनी पराभव केला होता. त्याप्रमाणे, 2009 च्या निवडणुकीत विजयकुमार गावित यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला 99323 मतांनी मात दिली होती.

Loading...

दरम्यान, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यांत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यंदा अगदी एकतर्फी निवडणूक होईल, असे सुरुवातीला वातावरण होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात चित्र पालटले आणि बहुतांशी ठिकाणी युतीविरुद्ध आघाडी अशी चुरश निर्माण झाली.

Exit Poll 2019: उत्तर महाराष्ट्रात 'कमळ' फुलणार की 'आघाडी'चा सुपडा साफ होणार

अभूतपूर्व बंडखोरीने निवडणुकीत भरला रंग..

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात 'इनकमिंग' झाले. परिणामी युतीच्या इच्छुकांनी अभूतपूर्व बंडखोरी केल्यामुळे निवडणुकीत चांगलेच रंग भरले. त्यातील अनेक इच्छुकांनी अखेरच्या टप्प्यात काँग्रेस व राष्ट्रवादीकडे मोर्चा वळवला. मात्र, तिथेही त्यांच्या वाट्याला निराशाच पडली. त्यामुळे बंडखोरीला चांगलाच ऊत आला. जिथे सेनेला जागा आहे तिथे भाजपचे आणि जिथे भाजपला जागा आहे तिथे सेनेचे बंडखोर उभे ठाकले. विशेष म्हणजे आपापल्या पक्षातून या बंडखोरांना मित्रपक्षाविरोधात उघड उघड रसद पुरवठा झाला. त्यातून युतीविरुद्ध युती अशी विचित्र आणि अंतर्गत अस्वस्थता वाढवणारी स्थिती बनली.

मंत्र्यांच्या खडाजंगीने वेधले...

गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील या मंत्रिमहोदयांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेप्रसंगी झालेल्या खडाजंगीने सगळ्याचे लक्ष वेधले. अखेरच्या टप्प्यात शरद पवारांच्या झंझावाती प्रचाराने राष्ट्रवादीत जान फुंकली. पवारांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हुरूप वाढवणारा होता खरा, पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी 'पोल मॅनेजमेंट'मध्ये आघाडीची मंडळी कमी पडल्याचे जाणवले. अखेर येथे युतीचा वरचष्मा राहील, असा अंदाज जवळपास सर्व खासगी वृत्तवाहिन्या आणि मतदानोत्तर चाचण्या करणाऱ्या संस्थांनी वर्तवले आहे. उत्तर महाराष्ट्रात लक्षवेधी मतदारसंघांत रोहिणी खडसे (मुक्ताईनगर) नव्या वारसदारांसह छगन भुजबळांसारख्या (येवला) दिग्गज नेत्याचाही समावेश आहे. मतदारांनी इथे व्यक्तीला प्राधान्य दिले गेले की पक्षाला हा निकष या मतदार संघातील लढतींत सर्वाधिक महत्त्वाचा ठरेल.

काय आहे एक्झिट पोलचा अंदाज?

महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

उत्तर महाराष्ट्रात 36 पैकी 31 जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी पतका फडकावणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुती- 31, (भाजप-18, शिवसेना-13), महाआघाडीला-6 (काँग्रेस-5, राष्ट्रवादी-1) जागांवर यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, मागील विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती यंदाच्या निवडणुकीत होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससा यंदाही मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र्य लढवली होती. निकाल पाहिले असता शिवसेना 07, भाजप 15, राष्ट्रवादी 05, काँग्रेस 07 तर अपक्ष 02 उमेदवार निवडून आले होते.

छगन भुजबळांचं मॅजिक चालणार..

या पोलनुसार, येवल्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर छगन भुजबळांचं मॅजिक चाललं आहे. छगन भुजबळ आणि येवला मतदारसंघ हे अनेक वर्षांचं समीकरण आहे. पैठणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या येवला-लासलगाव मतदारसंघातून छगन भुजबळ हे सलग तीन वेळा निवडून आले. यावेळी मात्र त्यांच्याच पक्षातले माणिकराव शिंदे यांनी त्यांना उमेदवारीसाठी आव्हान दिले आहे.

LIVE VIDEO : निकालाचा पहिला कल हाती, कोण आहे आघाडीवर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 12:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...