LIVE: अहमदनगर लोकसभा निवडणूक : सुजय विखे पाटील VS संग्राम जगताप, विजय कुणाचा?

LIVE: अहमदनगर लोकसभा निवडणूक : सुजय विखे पाटील VS संग्राम जगताप, विजय कुणाचा?

महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीत यावेळी नगरची जागा खूपच गाजली. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने लगेचच त्यांना उमेदवारीही दिली. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवलं.

  • Share this:

अहमदनगर, 13 मे : महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीत यावेळी नगरची जागा खूपच गाजली. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने लगेचच त्यांना उमेदवारीही दिली. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवलं.

आघाडीला धक्का

विरोधी पक्षनेत्याचा मुलगाच भाजपमध्ये आल्यामुळे इथे भाजपने आघाडीला जोरदार धक्का दिला. यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांनी अजून काँग्रेसचा राजीनामा दिलेला नाही.

काँग्रेसकडून भाजपकडे

नगरची ही जागा अनेक वर्षं काँग्रेसचा गड मानली जात होती. काँग्रेसने इथून ज्यांनाज्यांना उमेदवारी दिली त्या सगळ्यांचा विजय झाला. या जागेवर काँग्रेसने तब्बल 46 वर्षं राज्य केलं. 1998 मध्ये मात्र बाळासाहेब विखे पाटील शिवसेनेत गेल्यामुळे ही जागा शिवसेनेच्या पदरात पडली. त्यानंतर 1999 मध्ये भाजपचे दिलीप गांधी इथून विजयी झाले. 2004 मध्ये ही जागा राष्ट्रवादीला मिळाली आणि पुन्हा 2009 आणि 2014 मध्ये नगरची जागा भाजपकडे आली.

भाजपचा तीनदा विजय

शिवसेनेत असलेले बाळासाहेब विखे पाटील एनडीए सरकारमध्ये अर्थराज्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आलं. 2004 मध्ये मात्र बाळासाहेब विखे पाटील यांनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये परत आले. भाजप शिवसेना युतीतर्फे ही जागा भाजप लढवत आला आहे आणि तीनदा इथे भाजपचा विजयही झाला आहे.

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे आणि काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीकडून संग्राम जगताप रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन मुक्ती पार्टीनेही इथे आपले उमेदवार उतरवले आहेत.

नगरची जागा भाजप राखणार का ?

2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युतीचे उमेदवार दिलीप गांधी यांना 6 लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली आणि राष्ट्रवादीचे राजीव राजाळेंना 3 लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली. दिलीप गांधींचा त्यावेळी दणदणीत विजय झाला. त्यामुळेच नगरची जागा भाजप राखणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

नगर लोकसभा मतदारसंघात शेगाव, राहुरी, कर्जत जामखेड हे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. पारनेर शिवसेनेकडे आहे तर अहमदनगर शहर आणि श्रीगोंदा या दोन मतदारसंघांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे.

===========================================================================

SPECIAL REPORT : मनसेची 'वंचित फॅक्टर'ला टक्कर, 'या' मतदारसंघात कुणाला होणार फायदा?

First published: May 13, 2019, 5:23 PM IST

ताज्या बातम्या