LIVE: तौक्ते चक्रीवादळ अखेर गुजरातच्या किनाऱ्यावर धडकलं

कोरोना अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या बातम्या

 • News18 Lokmat
 • | May 18, 2021, 13:30 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:36 (IST)

  मुंबईत रुग्णसंख्या 1 हजारापेक्षाही कमी
  मुंबईत दिवसभरात केवळ 953 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 2258 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 44 रुग्णांचा मृत्यू

  20:14 (IST)

  राज्यासाठी सकारात्मक, दिलासादायक बातमी
  राज्यात दिवसभरात 52,898 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 28,438 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 679 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 90.69, मृत्युदर 1.54 टक्के
  राज्यात सध्या 4 लाख 19,727 ॲक्टिव्ह रुग्ण

  19:51 (IST)

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर
  तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण दौरा
  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा 3 दिवसांचा दौरा
  वि.प. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही असणार सोबत
  रवींद्र चव्हाण, प्रसाद लाडही दौऱ्यात सहभागी असणार

  19:30 (IST)

  समन्वय समितीची महत्वाची बैठक संपली
  काही अधिकारी बदलीबाबत चर्चा - एकनाथ शिंदे
  महामंडळ आणि समितीबाबत बैठकीत चर्चा
  'लवकर नियुक्ती करावी यासाठी चर्चा झाली'
  मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील - एकनाथ शिंदे
  'कोरोनामुळे या विषयावर होऊ शकली नव्हती बैठक'

  19:27 (IST)

  कोरोना रुग्णाच्या मृतदेहाजवळील साहित्य चोरी प्रकरण
  नागपूरच्या तहसील पोलिसांकडून टोळी गजाआड
  गणेश डेकाटे, छत्रपाल सोनकुसरेला केली अटक
  1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त

  19:22 (IST)

  पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी
  अखेर पुण्याला लसीचा साठा मिळाला
  2 दिवसांनंतर कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनचा पुरवठा
  पिंपरी-चिंचवड भागासाठी 12,400 डोस
  पुणे शहरासाठी 7 हजार 500 डोस प्राप्त
  उद्यापासून पुण्यात लसीकरण होणार सुरळीत
  45 वर्षांवरील व दुसरा डोस असणाऱ्यांनाच लस

  19:2 (IST)

  दमणमध्ये अडकलेल्यांचं रेस्क्यू ऑपरेशन
  जहाजात अडकलेल्या 78 जणांची सुटका
  78 जणांच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद
  शिपगन जहाजातून लोकांची सुखरूप सुटका

  18:58 (IST)

  नाशिक - कोरोना नवीन रुग्णांमध्ये लक्षणीय घट
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 1073 नवे रुग्ण
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 680 कोरोनामुक्त
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 32 रुग्णांचा मृत्यू

  18:47 (IST)

  लस खरेदीच्या जागतिक निविदेचा मुद्दा
  'केंद्रानं एकसमान धोरण मसुदा जाहीर करावा'
  खासदार राहुल शेवाळेंची मोदींकडे लेखी मागणी

  18:40 (IST)

  पालघर - वडराई समुद्रातून 137 जणांची सुटका
  कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरद्वारे सुखरूप सुटका
  नेव्ही, कोस्टगार्डला 6 तासांच्या प्रयत्नांनंतर यश
  बार्जा जहाजावर अडकले होते 137 जण

  कोरोना अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या बातम्या