प्रतीक्षा संपली...थोड्याच वेळात फैसला होणार महाराष्ट्राचा; पाहा Live निकाल

प्रतीक्षा संपली...थोड्याच वेळात फैसला होणार महाराष्ट्राचा; पाहा Live निकाल

सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. सर्व महाराष्ट्राला लागलेली निकालाची उत्सुकता आता थोड्याच वेळात संपणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीचा गड राखणार का? काँग्रेस-राष्ट्रवादी आपल्या जागा वाढविणार की घसरणार? मनसेचं खातं उघडणार का? वंचितचं काय होणार? यासगळ्यांची प्रतिक्षा आता थोड्यात वेळात संपणार आहे. या निकालांचे प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार असून निकालाची क्षणाक्षणाची बित्तमबातमी तुम्ही आमच्या वेबसाईटवर पाहू शकता.

SPECIAL REPORT : भोलेनाथ फडणवीसांना पावणार का? होणार का पुन्हा मुख्यमंत्री?

21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. या वेळी भाजप- शिवसेना-आरपीय महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा सरळ लढा होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही 101 जागा लढवत काही मतदारसंघात चुरशीची स्पर्धा निर्माण केली. वंचित बहुजन आघाडीमधून आणि MIM यांची फारकत झाल्याने एकत्रित परिणाम कमी झाला. तरी वंचित फॅक्टर मराठवाड्यात कमाल करतो का याची उत्सुकता आहे. प्रचारादरम्यान भाजप, शिवसेनेला खरी लढत दिली शरद पवार यांनी. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे सभांना गर्दी खेचली तरी त्याचा परिणाम मतपेटीवर किती झाला हे कळेलच.

2014 ची विधानसभेची परिस्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला.

नरेंद्र मोदींच्या फेव्हरेट तीर्थस्थानी निकालाआधी फडणवीसांची महापूजा

निकालाआधीच भाजपची जल्लोषाची तयारी, 5000 लाडूंची ऑर्डर!

2019 विधानसभा कोणी किती जागा लढवल्या?

भाजप 150

शिवसेना 124

काँग्रेस 147

राष्ट्रवादी 121

मनसे 101

वंचित बहुजन आघाडी 235

MIM 44

बहुजन समाज पार्टी 262

कम्युनिस्ट पार्टी 16

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी 8

समाजवादी पार्टी 7

EXIT Poll चे निकाल

News18 Lokmat  आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो.

News18 IPSOS मतदानोत्तर चाचणी

भाजप - 141

सेना - 102

काँग्रेस - 17

राष्ट्रवादी - 22

MIM - 01

मनसे - 01

इतर  - 02

अपक्ष - 03

--------------

भाजप सेना युती - 243

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी - 41

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 07:00 AM IST

ताज्या बातम्या