हातकणंगले लोकसभा मतदारसंघात या कारणामुळे राजू शेट्टी यांचा झाला पराभव

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात या कारणामुळे राजू शेट्टी यांचा झाला पराभव

राजू शेट्टी पराभव होतोय, यावर शरद पवारांनी सूचक वक्तव्य केलं आहे. राजू शेट्टी पराभव छायेत पाहून शरद पवार म्हणाले, नेमकं कारण शोधावं लागणार आहे. या मागे सामाजिक, इतर कारण आहे का, हे पाहावे लागेल.

  • Share this:

हातकणंगले, 23 मे- हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील 10 वर्षांपासून खासदार असलेले शेतकरी नेते राजू शेट्टी यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींनी भाजपशी युती केली. NDA चा घटकपक्ष या नात्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पण, यावेळी मात्र ते UPA सोबत आहेत. येथून शिवसेनेचे धैर्यशील माने राजू शेट्टी यांचा पराभव केला. दुसरीकडे, राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेने धैर्यशील माने यांच्यासोबत बसप आणि वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवारही रिंंगणात होते.

शरद पवारांनी केले सूचक वक्तव्य..

राजू शेट्टी पराभव होतोय, यावर शरद पवारांनी सूचक वक्तव्य केलं होते. राजू शेट्टी पराभव छायेत पाहून शरद पवार म्हणाले, नेमकं कारण शोधावं लागणार आहे. या मागे सामाजिक, इतर कारण आहे का, हे पाहावे लागेल.

ही आहेत राजू शेट्टी यांच्या पराभवाची कारणे..

- मराठा मतं मिळाली नाहीत.

- जैनविरुद्ध मराठा असा संघर्ष.

- राज्य आणि देश पातळीवरच्या आंदोलनांमुळे शेट्टी यांचं मतदारसंघाकडे दुर्लक्ष.

- सलग 10 वर्षे खासदार असल्यानं शेट्टींविरोधात सत्ता विरोधी लाट

- गेल्या 5 वर्षांत मतदारसंघात जनसंपर्क कमी

- ब्राम्हण समाजाबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं

- मोदी, अमित शहा, चंद्रकांत पाटील यांच्यावरील सततच्या टीकेमुळे नाराजी

ही आहेत धैर्यशील माने यांच्या विजयाची कारणे-

- मराठा समाज धैर्यशील माने यांच्या पाठीशी.

- तरुण नेतृत्त्व, नवमतदारांची मतं.

- इचलकरंजी, जयसिंगपूरमधील उद्योजकांचा पाठिंबा.

- मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघात स्वतः घातलेलं लक्ष.

- विनय कोरे गटाचा अंतर्गत पाठिंबा.

- शेट्टींविरोधातील सत्ताविरोधी लाटेचा फायदा.

मागच्या 2 निवडणुकांमध्ये विजय

-शेतकऱ्यांच्या मागण्यांचा अजेंडा घेऊन लढणाऱ्या राजू शेट्टींनी 2009 आणि 2014 च्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे आता राजू शेट्टी पुन्हा विजयी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

-2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींना 6 लाख 40 हजार 428 मतं मिळाली होती. त्याचवेळी काँग्रेसचे कलप्पा आवाडे यांना 4 लाख 62 हजार 618 मतं मिळाली.

-2009 च्या निवडणुकीत राजू शेट्टी यांना मोठा विजय मिळाला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदिता मानेंचा पराभव केला होता.

राजकीय इतिहास

-हातकणंगलेच्या जागेवर एकेकाळी काँग्रेसचं वर्चस्व होतं. 1999 पर्यंत हा दबदबा कायम राहिला. पण त्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाकडे गेली.

-हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यात शाहूवाडी, हातकणंगले आणि शिरोळ या जागा शिवसेनेकडे आहेत. इचलकरंजी आणि -शिराळ्यामध्ये भाजपचे आमदार आहेत तर इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

शेतकरी संघटनेत काम

-राजू शेट्टी या भागातले लोकप्रिय नेते आहेत.याआधी त्यांनी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेमध्ये काम केलं. नंतर पहिल्यांदा त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली. -2004 मध्ये ते विधानसभेत गेले. त्यानंतर 2009 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हा स्वतंत्र पक्ष त्यांनी स्थापन केला. त्यांच्या या पक्षाचा दबदबा याही निवडणुकीत पाहायला मिळणार का, अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 07:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading