मुंबई, 23 मे- शिवसेनेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा त्यांच्या होमटाऊनमध्ये अर्थात नांदेडमध्ये दारुण पराभव केला आहे. नांदेडची जागा ही माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा गड मानला जात होता. मात्र, शिवसेनेचे प्रताप चिखलीकर यांच्या विजयाने काँग्रेसच्या गडाला सुरुंग लागला आहे. नांदेडमध्ये समाजवादी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असल्याने ही लढत काहीशी बहुरंगी ठरली होती. पण, मुख्य लढत भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेसमध्येच होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरला. काँग्रेसची हक्काची वोटबँक अक्षरश: वंचितकडे वळली. दलित, मुस्लिमांची मतं देखील वंचितकडे वळल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वंचित फॅक्टरमुळे अशोक चव्हाण यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली.
कोण आहेत प्रताप पाटील चिखलीकर?
शिवसेनेने यावेळी अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध प्रताप चिखलीकर यांना नांदेडमधून उमेदवारी दिली होती. प्रताप चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याबरोबरच राजकीय प्रवास सुरु केला होता. पण मध्यतंरीच्या काळात अशोक चव्हाण आणि प्रताप चिखलीकर यांच्यात मतभेद झाले होते. त्यामुळे प्रताप चिखलीकर हे विलासराव देशमुख यांच्या गोटात सहभागी झाले होते. नंतर त्यांनी 2012 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु तिथेही कंटाळलेल्या प्रताप चिखलीकर यांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.
अशी झाली मतांची विभागणी...
प्रताप पाटील चिखलीकर: 391530(भाजप)
यशपाल भिंगे: 351736 (वंचित अघाडी)
अशोक चव्हाण: 328854(काँग्रेस)
ही आहेत अशोक चव्हाणांच्या पराभवाची कारणे..
- भाजपनं दिलेलं अशोक चव्हाणविरुद्ध मोदी असं स्वरूप
- ग्रामीण भागात भाजपला पाठिंबा
- खासदार, प्रदेशाध्यक्ष असल्यानं मतदारसंघात दिलेला कमी वेळ
- काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि मुख्य पदाधिकाऱ्यांबद्दल असलेली नाराजी
- वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरला
- काँग्रेसची हक्काची वोटबँक वळली वंचितकडे
- दलित, मुस्लिमांची मतं वंचितकडे वळल्याचा अंदाज
ही आहेत प्रताप चिखलीकरांच्या विजयाची कारणे..
- अशोक चव्हाणांचे जिल्ह्यातील एकमेव कट्टर राजकीय विरोधक
- चव्हाणांच्या अन्य विरोधकांची साथ मिळाली
- काँग्रेसच्या तुलनेत बलाढ्य उमेदवार आहे
-पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडवणीस यांच्या झालेल्या सभा
-राष्ट्रवादीच्या नाराज गटानं दिलेली छुपी साथ
- भाजपनं लावलेली पूर्ण ताकद
VIDEO : भाजपचा विराट विजय, मोदींच्या आईंनी असा दिला आशीर्वाद!