जळगाव लोकसभा निवडणूक LIVE:भाजपचे उन्मेष पाटलांचा विजय जवळजवळ निश्चित

जळगाव लोकसभा निवडणूक LIVE:भाजपचे उन्मेष पाटलांचा विजय जवळजवळ निश्चित

उत्तर महाराष्ट्रातली जळगावची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. 1999 पासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत इथे भाजपचा विजय झाला आहे. भाजपने यावेळी इथून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना रिंगणात उतरवलं.

  • Share this:

जळगाव, 23 मे - जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार उन्मेष पाटील तर महाआघाडीचे गुलाबराव देवकर यांच्यात काट्याची टक्कर आहे. 23एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर आज (23 मे) रोजी सकाळी आठ वाजेपासून शासकीय गोदामात मतमोजणी सुरू झाली आहे. यातील उन्मेष पाटील मोठ्या मताधिक्यांनी मतांची आघाडी घेतली आहे. यात देवकर आप्पा हे खूप पिछाडीवर आहेत. त्यामुळे जळगाव मतदारसंघात भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांचा विजय जवळजवळ निश्चित झाला आहे.  उन्मेष पाटील ह 383,525 आघाडीवर आहेत.

उत्तर महाराष्ट्रातली जळगावची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. 1999 पासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत इथे भाजपचा विजय झाला आहे. भाजपने यावेळी इथून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना रिंगणात उतरवलं.

गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय

उन्मेश पाटील हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने मंत्री महाजन यांच्या जळगाव येथील कार्यालयात कार्यकर्त्यांमार्फत मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. ढोल ताश्यांच्या गजरात कार्यकर्ते नाचताना दिसत असून महिला कार्यकर्त्यां या फुगडी खेळून जल्लोष साजरा करत आहेत. यात जळगावचे आमदार सुरेश भोळे, आमदार चदूलाल पटेल, महापौर सीमा भोळे या देखील सहभागी झाल्या आहेत

स्मिता वाघ यांचे ऐनवेळी तिकीट कापून उन्मेष पाटलांना दिली उमेदवारी..

भाजपने या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा स्मिता वाघ यांना तिकीट दिलं होतं. स्मिता वाघ यांनी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरला पण पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द केली आणि उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. जळगावमध्ये गेली दोन दशकं जळगावमध्ये भाजप-शिवसेनेचा दबदबा आहे. पण, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने ही जागा मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.  दरम्यान, जळगावमध्ये 23 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं. इथे 56.19 टक्के मतदानाची नोंद झाली.

2014 च्या निवडणुकीत काँग्रेसवर मात

मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला इथे मोठा विजय मिळाला. भाजपचे नेते ए.टी. नाना पाटील यांनी काँग्रेसचे नेते डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला. ए.टी. नाना पाटील यांना 6 लाख 47 हजार 773 मतं मिळाली तर सतीश पाटील यांना 3 लाख 83 हजार 525 मतं मिळाली.

भाजपचा विजयरथ

-जळगावमध्ये काँग्रेस भाजपचा विजयरथ रोखू शकलेलं नाही. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत इथून ए. टी. नाना पाटील खासदार म्हणून निवडून आले.

-जळगावमध्ये जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव आणि पाचोरा हे विधानसभा मतदारसंघ येतात. या सगळ्या विधानसभा मतदारसंघांत भाजप आणि काँग्रेसला कसा प्रतिसाद मिळाला ते पाहावं लागेल.

VIDEO : आता 'लावा ना व्हिडिओ', मुनगंटीवारांचा राज ठाकरेंना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 01:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading