नंदुरबार लोकसभा निवडणूक 2019 LIVE: डॉ. हिना गावित 90 हजार मतांनी विजयी

नंदुरबार लोकसभा निवडणूक 2019 LIVE: डॉ. हिना गावित 90 हजार मतांनी विजयी

उत्तर महाराष्ट्रातली नंदुरबारची जागा आदिवासीबहुल आहे. यावेळी ही जागा अनुसूचित जातीजमातींसाठी राखीव आहे. भाजपने इथे विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांना उमेदवारी दिली आहे.

  • Share this:

नंदुरबार, 23 मे - भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी 90 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. केवळ औपचारीक घोषणा होणे बाकी आहे. डॉ.गावीत या मतदार संघातून दुसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत. डॉ.गावीत यांना 5 लाख 84 हजार 828 तर काँग्रेस उमेदवार के.सी.पाडवी यांना 5 लाख 13 हजार 835 मते मिळाली.

उत्तर महाराष्ट्रातली नंदुरबारची जागा आदिवासीबहुल आहे. यावेळी ही जागा अनुसूचित जातीजमातींसाठी राखीव आहे. भाजपने इथे विद्यमान खासदार डॉ.हीना गावित यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसतर्फे के.सी.पाडवी यांनी निवडणूक लढवली. दरम्यान, नंदुरबार लोकसभा मतदार संघातील जनतेने आपणास पुन्हा एकदा खासदार बनवत सेवेची संधी दिल्याबाबत डॉ.हिना गावीत यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

हिना गावीत यांच्या विजयाची कारणे..

-मोदी लाटेचा प्रभाव

-योजना ताळागाळापर्यंत गावापर्यंत पोहचवला

- संस्थाचं नेटवर्क

- स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी

के. सी.पाडवी यांच्या पराभवाची कारणे..

- नेटवर्क नाही

- कार्यकर्त्यांची फळी नाही

हीना गावित यांचं रेकॉर्ड

2014 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. हीना गावित यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव गावीत यांचा पराभव करून रेकॉर्ड केलं. त्याआधी माणिकराव गावीत हे सलग 9 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये हीना गावित यांना 5 लाख 79 हजार 486 मतं मिळाली तर माणिकराव गावीत यांना 4 लाख 72 हजार 581 मतं मिळाली. डॉ.हिना गावीत या संसदेतल्या तरुण खासदार ठरल्या.

काँग्रेसचं वर्चस्व

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्या प्रचाराची सुरुवात नंदुरबारमधून करायच्या. त्यामुळे इतकी वर्षं इथे काँग्रेसचं वर्चस्व होतं. गेल्या निवडणुकीत डॉ. हीना गावित यांनी काँग्रेसची ही मक्तेदारी मोडून काढली.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, साक्री आणि शिरपूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये शहादा आणि नंदुरबार या जागा भाजपकडे आहेत तर अक्कलकुवा, नवापूर, साक्री आणि शिरपूरमध्ये काँग्रेसचं वर्चस्व आहे.

जोरदार टक्कर

डॉ. हीना गावित यांचे वडील डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबारमधून भाजपचे आमदार आहेत तर डॉ. हीना गावित यांनी खासदार म्हणून काम केलं. या निवडणुकीत मात्र काँग्रेसचे के. सी. पाडवी यांनी डॉ. हीना गावित यांना जोरदार टक्कर दिल्याची चर्चा आहे. आता ही जागा पुन्हा काँग्रेसकडे जाते की भाजपच्या हीना गावित खासदारकी राखू शकतात हे 23 मे ला कळेल.

VIDEO : भाजपचा विराट विजय, मोदींच्या आईंनी असा दिला आशीर्वाद!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 02:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading