औरंगाबादेत इम्तियाज जलील विजयी, शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना मारक ठरला 'जावई' फॅक्टर

औरंगाबादेत इम्तियाज जलील विजयी, शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना मारक ठरला 'जावई' फॅक्टर

ओबीसी मतदारांचे पाठबळ, हिंदुत्वाच्या मुद्या, कट्टर धार्मिक प्रतिमा, कट्टर शिवसैनिक एवढेच नाही तर ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक असतानाही चंद्रकांत खैरे यांना या निवडणुकीत यश मिळवता आले नाही.

  • Share this:

औरंगाबाद, 23 मे- शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या औरंगाबादमध्ये वंचित फॅक्टरमुळे चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील हे विजयी झाले आहेत. त्यात भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या आव्हानाचा खैरेंना 'सामना' करावा लागला. रावसाहेब दानवे यांनी जावयाचा प्रचार केला असा आरोपही खैरे यांनी केला होता. खैरे-दानवे वाद थेट मातोश्रीवरही पोहोचला होता.

खैरेंना तरी मिळवता आले नाही यश...

ओबीसी मतदारांचे पाठबळ, हिंदुत्वाच्या मुद्या, कट्टर धार्मिक प्रतिमा, कट्टर शिवसैनिक एवढेच नाही तर ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक असतानाही चंद्रकांत खैरे यांना या निवडणुकीत यश मिळवता आले नाही.

..तरी देखील इम्तियाज जलील यांनी खेचून आणली विजश्री!

आमदार इम्तियाज जलील हे वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. इम्तियाज जलील यांची केवळ मुस्लिम मतांच्या जोरावर निवडून येणे शक्य नव्हते. मात्र, वंचित फॅक्टरदलित तशी कमीत होती.

सुभाष झांबड यांना बसला वंचित फॅक्टरचा फटका..

सुभाष झांबड यांना काँग्रेसमधली अंतर्गत गटबाज नडल. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचार केला नाही. महत्त्वाचे कारण म्हणजे झांबड यांना वंचित आघाडीमुळे फटका बसला. एमआयएममुळे काँग्रेसचे मतविभाजन करण्यात आले.

औरंगाबादमध्ये MIM फॅक्टरचा परिणाम..

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांत मराठा समुदायाचं वर्चस्व आहे. कन्नड, औरंगाबाद पश्चिम या विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा ताबा आहे. औरंगाबादमधीस एका विधानसभेची जागा मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIMच्यात ताब्यात आहे. औरंगाबाद पूर्व आणि गंगापूरमध्ये भाजपचं वर्चस्व आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा कब्जा आहे.

मागच्या निवडणुकीत खैरेंचा विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश पाटील यांचा पराभव केला होता. चंद्रकांत खैरे यांना 5 लाख 20 हजार 902 मतं मिळाली तर सुरेश पाटील यांना 3 लाख 58 हजार 902 मतं होती.

अनेक वर्षं सेनेचं वर्चस्व

1998 ची लोकसभा निवडणूक सोडली तर शिवसेना इथे 1989 पासून 2014 पर्यंतच्या निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व राखून आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजप शिवसेना युतीने काँग्रेसवर जोरदार मात केली. आताही शिवसेना - भाजपची युती असली तरी मतदार सेनेला कौल देतात का हे पाहावं लागेल.

First published: May 23, 2019, 8:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading