औरंगाबाद लोकसभा निवडणूक 2019 LIVE: खैरे अद्यापही तिसऱ्या क्रमांकावर, जलील आघाडीवर

औरंगाबाद लोकसभा निवडणूक 2019 LIVE: खैरे अद्यापही तिसऱ्या क्रमांकावर, जलील आघाडीवर

औरंगाबादमधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे सलग चार वेळा खासदार झाले. यावेळी मात्र काँग्रेसचे सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 23 मे - औरंगाबादची लोकसभेची जागा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना यंदा मतदारांनी स्पष्ट नाकारल्याचे चित्र दिसत आहे. खैरे हे पहिल्या फेरीत आघाडीवर होते. मात्र त्यानंतर ते चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. एमआयएमचे उमेदवार  इम्तियाज जलील हे आघाडीवर आहेत. दुसऱ्य़ा क्रमांकावर अपक्ष हर्षवर्धन जाधव आहेत. हर्षवर्धन जाधव हे भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

औरंगाबाद खैरे अद्यापही तिसऱ्या क्रमांकावर

इम्तियाज जलील- 1,10783 (एमआयएम)

हर्षवर्धन जाधव-  92,941 (अपक्ष)

चंद्रकांत खैरे- 89,367 (शिवसेना)

सुभाष झांबड -21,664 (काँग्रेस)

चंद्रकांत खैरेंसमोर मोठं आव्हान

खैरे चार वेळा खासदार झाले आहेत. यावेळी मात्र काँग्रेसचे सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळेच औरंगाबादमध्ये यावेळी तिरंगी लढत आहे.

मागच्या निवडणुकीत खैरेंचा विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश पाटील यांचा पराभव केला होता. चंद्रकांत खैरे यांना 5 लाख 20 हजार 902 मतं मिळाली तर सुरेश पाटील यांना 3 लाख 58 हजार 902 मतं होती.

अनेक वर्षं सेनेचं वर्चस्व

1998 ची लोकसभा निवडणूक सोडली तर शिवसेना इथे 1989 पासून 2014 पर्यंतच्या निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व राखून आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजप शिवसेना युतीने काँग्रेसवर जोरदार मात केली. आताही शिवसेना - भाजपची युती असली तरी मतदार सेनेला कौल देतात का हे पाहावं लागेल.

औरंगाबादमध्ये MIM फॅक्टर

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांत मराठा समुदायाचं वर्चस्व आहे. कन्नड, औरंगाबाद पश्चिम या विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा ताबा आहे. औरंगाबाद विधानसभेची जागा मजलिस - ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM चा ताबा आहे. औरंगाबाद पूर्व आणि गंगापूरमध्ये भाजपचं वर्चस्व आहे.वैजापूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा कब्जा आहे.

औरंगाबादमध्ये तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. या मतदानात मतदारांनी कुणाला कौल दिला हे 23 मे ला च कळू शकेल.

VIDEO : 'राज ठाकरेंवर करमणूक कर लावला पाहिजे'

First published: May 23, 2019, 1:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading