मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, शरद पवारांचे मानले आभार

एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, शरद पवारांचे मानले आभार

कमळ सोडून एकनाथ खडसेंनी अखेर हाती घेतलं घड्याळ

कमळ सोडून एकनाथ खडसेंनी अखेर हाती घेतलं घड्याळ

कमळ सोडून एकनाथ खडसेंनी अखेर हाती घेतलं घड्याळ

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 23 ऑक्टोबर : एकनाथ खडसे यांना अखरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर नाथाभाऊंची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपकडून अन्याय झाल्याची नाथाभाऊंच्या समर्थकांनी म्हटलं आहे. तर पक्षात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत.

भाजपला रामराम ठोकून अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपचे कमळ मागे सोडत खडसेंनी आता घड्याळ हाती घेतलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे देखील उपस्थित होत्या. तर एकनाथ खडसे यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे भाजपला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याचा इशारा अनिल भाईदास पाटील यांनी गिरीश महाजन आणि भाजपला दिला आहे.

हे वाचा-LIVE: मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं पॅकेज फसवं, भाजपने केली टीका

एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. प्रवेशाआधी एकनाथ खडसेंनी कोणत्याही पदाची मागणी केली नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. कमळ मागे सोडून हातात घड्याळ बांधल्यानंतर एकनाथ खडसेंची वेळ बदलणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Eknath khadse