बीड लोकसभा निवडणूक 2019 LIVE: भाजपाच्या डॉ प्रीतम मुंडे मोठ्या मताधिक्याने विजयी

बीड लोकसभा निवडणूक 2019 LIVE: भाजपाच्या डॉ प्रीतम मुंडे मोठ्या मताधिक्याने विजयी

बीडची लोकसभेची जागा सगळ्यात जास्त मताधिक्याने विजय मिळवून देणारी जागा मानली जाते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या डॉ. प्रीतम मुंडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

  • Share this:

बीड, 23 मे - बीडची लोकसभेची जागा सगळ्यात जास्त मताधिक्याने विजय मिळवून देणारी जागा मानली जाते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या डॉ. प्रीतम मुंडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. डॉ. प्रीतम यांनी मागील निवडणुकीत इथे सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचं रेकॉर्ड केलं होतं. ही परंपरा या निवडणुकीतही त्यांनी कायम ठेवली आहे. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात मुख्य लढत झाली.  डॉ. प्रीतम यांच्या विजयाची प्रशासनाकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

डॉ. प्रीतम यांची मतदार संघनिहाय आघाडी

परळी -18,919

माजलगाव -19716

केज -28000

गेवराई-34888

बीड-06262

आष्टी -70044

एकूण-1 लाख 77 हजार 829

पोटनिवडणुकीत केलं होतं रेकॉर्ड...

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना 9 लाख 22 हजार 416 मतं मिळाली. त्या 6 लाख 96 हजार 321 मताधिक्य मिळवून निवडून आल्या.

या निवडणुकीतही भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली आहे.त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना तिकीट दिलं. वंचित बहुजन आघाडी आणि बसपानेही इथे उमेदवार उतरवले आहेत. या सगळ्या उमेदवारांना टक्कर देत प्रीतम मुंडे बीडमधून पुन्हा विजयी होणार का ? याची जोरदार चर्चा आहे.

गोपीनाथ मुंडेंचं निधन

2014 मध्ये आलेल्या मोदी सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे केंद्रीय ग्रामविकास मंत्री झाले. पण त्यानंतर काही दिवसांतच गोपीनाथ मुंडेंचं दिल्लीमध्ये कार अपघातात निधन झालं. भाजपला हा मोठा धक्का होता.

गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर बीडमध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंची मुलगी प्रीतम मुंडे रिंगणात उतरल्या. त्यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. त्यांनी काँग्रेसचे अशोक पाटील यांचा पराभव केला.

2014 ची लोकसभा निवडणूक

2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे बीडमधून लढले आणि त्यांनी 6 लाख 35 हजार 995 मतं मिळवून विजय मिळवला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही गोपीनाथ मुंडेंचा विजय झाला होता. आता पुन्हा एकदा प्रीतम मुंडे ही विजयाची परंपरा कायम राखणार का ते 23 मे ला कळेल.

बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई, माजलगाव, आष्टी, केज, परळी या विधानसभा मतदारसंघांवर भाजपचं वर्चस्व आहे तर बीड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे.

बीडमध्ये याही निवडणुकीत महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या बहीणभावांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली.

VIDEO : 'राज ठाकरेंवर करमणूक कर लावला पाहिजे'

First published: May 23, 2019, 8:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading